लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : मासेविक्री करण्यासाठी वसईवरून आलेल्या दोन कोळी महिलांचा ठाकुर्ली रेल्वे स्थानकात रेल्वेची धडक बसून मृत्यू झाला. गीता संतोषी जेबी (३५) आणि मंजुळा नारायण बाजा (४०) अशी या महिलांची नावे आहेत. या दोघी अन्य कोळी महिलांसह दिवा-वसई रेल्वेने अप्पर कोपर रेल्वे स्थानकात उतरल्या. इतर महिला रिक्षात बसून गेल्या. मात्र दोघींचा ठाकुर्ली येथील रेल्वे रूळ ओलांडताना मृत्यू झाला. अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
रेल्वे अपघातात दोघींचा मृत्यू
By admin | Updated: June 6, 2017 05:48 IST