नांदेड : राज्यात सत्तेवरवरील युती सरकारमधील धुसफुस सुरूच आहे़ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारमध्ये असलो तरी आम्ही शेपूट गुंडाळले नसल्याचे वक्तव्य केल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा़ रावसाहेब दानवे यांनी सोमवारी नांदेडमध्ये प्रत्युत्तर दिले़ त्यांनी शेपूट गुंडाळले नाही अन् आम्हीही गुंडाळले नाही़ दोघेही पक्ष वाढविण्यासाठी मोकळे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले़भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दानवे यांनी पंढरपूर, तुळजापूर आणि माहूर येथे दर्शन घेऊन राज्याच्या दौऱ्याला सोमवारी नांदेडमधून प्रारंभ केला आहे़ पक्ष सदस्य नोंदणी व नांदेड जिल्ह्यातील मुखेड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आढावा घेतला़ प्रारंभी पत्रपरिषदेत दानवे यांनी मंत्रिपदापेक्षा संघटनेला महत्त्व देऊन प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्याचे सांगितले़ आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका निवडणुकांत शिवसेनेसोबत जायचे की नाही याचे सर्वाधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले़ राज्यात भाजपाचे ३१ मार्चपर्यंत सदस्य नोंदणी अभियान चालणार आहे़ भारतात भाजपाचे १० कोटी सदस्य करण्याचा संकल्प पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे़ त्यामध्ये महाराष्ट्रात १ कोटी सदस्य नोंदणी करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले़ (प्रतिनिधी)काँग्रेसचे इन्काउंंटर करण्यासाठी आंग्रेंना प्रवेशइन्काउंटरफेम आंग्रे यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला असून, त्यांच्यावरील आरोपांबाबत दानवेंना विचारणा केली असता ते म्हणाले, कुणाही विरोधात किरकोळ स्वरूपाचे गुन्हे असतील तर त्यांना भाजपा प्रवेश नाकारणार नाही़ काँग्रेसच्या इन्काउंटरसाठीच आंग्रे यांना भाजपात प्रवेश दिल्याचे ते म्हणाले़
दोघांनीही शेपूट गुंडाळले नाही -रावसाहेब दानवे
By admin | Updated: February 3, 2015 01:35 IST