शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

बेळगावातील दोघे ताब्यात

By admin | Updated: December 21, 2015 00:46 IST

अर्भक विक्री प्रकरण : जत्रेतील नारळ विक्रीच्या नावाखाली करायचे मुलांची चोरी

सावंतवाडी : अर्भक विक्रीप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी बेळगाव पोलिसांच्या मदतीने पकडलेले अब्दुल करीम नदाफ (वय ४२), रूपा रामचंद्र टकले (वय ३६) हे दोघेही पती-पत्नी असल्याचे तपासात पुढे आले आहे. नारळ विक्रीच्या नावाखाली जत्रेत जाऊन लहान मुलांची चोरी करायची आणि ती विकायची असाच धंदा या दोघांचा सुरू होता. त्यातूनच त्यांची आंगणेवाडीच्या जत्रेत शिरोडा येथील भक्तीशी ओळख झाल्याचे पोलीस तपासात पुढे आले असून, बेळगाव पोलीस लवकरच भक्तीच्या शोधासाठी सिंधुुुदुर्गमध्ये येणार आहेत.चार दिवसांपूर्वी सावंतवाडीतील बंड्या कोरगावकर यांना बेळगाव येथून एका महिलेचा फोन आला. त्यांनी हा भक्तीचा फोन काय, असे कोरगावकर यांना विचारले. मात्र, कोरगावकर यांनी मी भक्तीचा पती बोलतो, असे सांगितले. त्यानंतर त्या महिलेने आपल्याकडे एक मूल असून ते हवे असल्यास ५ लाख रूपये घेऊन या, असे कोरगावकर यांना सांगितले होते. असे तीन ते चार वेळा याच महिलेचे फोन आल्याने बंड्या कोरगावकर व भाजपच्या महिला तालुकाध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी पोलिसांशी संपर्क साधला होता. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने या प्रकरणाची दखल घेत शुक्रवारी बंड्या कोरगावकर यांचे फोन टॅप करण्यात आले होते.याचवेळी या महिलेचा शुक्रवारी ११ च्या सुमारास फोन आला आणि तिने पुन्हा एकदा कोरगावकर यांना आॅफर दिली. त्यानंतर पोलिसांनी लागलीच तपासाची सूत्रे हलवली. पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांनी आपले एक पथक या तपासासाठी सज्ज केले आणि त्यांना शनिवारी सायंकाळी बेळगाव येथे पाठवण्यात आले. मात्र, पोलिसांनी बेळगाव येथे पोचण्यापूर्वी सर्व खबरदारी घेतली होती. बंड्या कोरगावकर हे आंबोली येथूनच महिलेच्या सतत संपर्कात होते. त्यांनी आपण बेळगाव येथे येत असल्याचे सांगितले. त्यामुळे महिलेने आज तुम्ही या, पण मुलगा आज देणार नाही, उद्या देतो असे त्यांना सांगितले होते.सावंतवाडी पोलीस सायंकाळी बेळगावात पोचल्यानंतर त्यांनी पीएमसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कुंभार यांची मदत घेतली. आरोपींना कसे भेटायचे याचे नियोजन केले. ठरल्याप्रमाणे बेळगावात चनम्मा चौकात दोघांचे भेटण्याचे निश्चित झाले. त्यानुसार बंड्या कोरगावकर त्यांना भेटण्यासाठी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गेले. यावेळी रूपा टकले व अब्दुल नदाफ तेथे आले. त्यांची समोरासमोर भेट होताच सावंतवाडी, बेळगाव पोलिसांनी त्या आरोपींना ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)जत्रोत्सवांत वावर : भक्तीच्या शोधात पोलीसबेळगाव येथून ताब्यात घेतलेले हे आरोपी बऱ्याच वेळा सिंधुदुर्गमध्ये येऊन गेले होते. त्यांनी सिंधुदुर्गमधील जत्राही केल्या असून ते नारळ विक्रीच्या निमित्ताने जत्रेला यायचे. आपण व्यापारी असल्याचा बहाणा ते करीत असत आणि त्यातूनच ते गिऱ्हाईक शोधत होते, असे बेळगाव पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.यावेळी पोलिसांना टकले व नदाफ या आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, शिरोडा येथील भक्ती मालवण येथील आंगणेवाडीच्या जत्रेत आरोपींना भेटली होती. ही दोघेही पतीपत्नी नारळ व्यवसायाच्या निमित्ताने जत्रेत आली होती. आरोपींनी भक्तीची ओळख काढत मुल हवे असल्यास आमच्याकडे आहे, असे सांगितले होते. त्याला भक्तीने होकार दिल्यानेच आरोपी सतत भक्तीच्या संपर्कात होते. मात्र, त्यांचा नेम चुकला आणि तो राँग नंबर बंड्या कोरगावकर यांना लागल्याने अखेर या प्रकरणाचा पर्दाफाश झाला.पंढरपूरातून मुले आणून सिंधुदुर्गात विक्रीदोन्ही आरोपी सराईत असून मूळ बेळगाव येथीलच राहणारे आहेत. दोघेही मोठमोठ्या जत्रा करतात आणि मुले चोरतात. त्यांचे काही साथीदार पंढरपूर येथे असून त्यांना तेथून मुले पुरवली जातात. याची माहिती या आरोपींनी बेळगाव पोलिसांना दिली असून, बेळगाव पोलीस पंढरपूर येथे गेले आहेत. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत यामध्ये आणखी कोण सापडले नसल्याचे पोलीस उपनिरीक्षक कुंभार यानी सांगितले.विधानसभेत हंगामाकर्नाटकमधून सतत मुलांचे अपहरण, विक्री यामुळे कर्नाटक विधानसभेत हंगामा होत होता. यामुळे कर्नाटक पोलिसांची तपास यंत्रणा गोंधळात सापडली होती. मात्र, शनिवारी दोघेही सापडल्याने यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला. आरोपींची बेळगाव येथील पीएमसी पोलीस ठाण्यात येऊन आयुक्त एस. रवी यांनी चौकशी केली. यावेळी कर्नाटक गुन्हा अन्वेषण विभागाचे उपायुक्त मंजुनाथ रेड्डी उपस्थित होते.राँग नंबरमुळे गुन्हा घडला असून या प्रकरणी बेळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यामुळे सावंतवाडी पोलीस स्वतंंत्र गुन्हा दाखल करणार नसल्याने आरोपींचा ताबा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. - रणजीत देसाई, पोलीस निरीक्षकअर्भक प्रकरणातील आरोपी पकडले असले तरी मूल कोणाला हवे होते, याचा तपास करणे गरजेचे असल्याने आरोपींना घेऊन सिंधुदुर्गमध्ये येणार असून, भक्तीचा शोध घेणार आहे.- कुंभार, उपनिरीक्षक, बेळगावपोलीस आयुक्तांकडून कोरगावकर यांचे अभिनंदनमुलांच्या अपहरणामुळे कर्नाटक विधानसभेत हंगामा झाल्यानंतर पोलिसांनी सर्वत्र तपासाची चक्रे फिरवली. मात्र, त्यांना यश आले नव्हते. पण बंड्या कोरगावकर यांच्या समयसुचकतेमुळे दोन्ही आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. त्यामुळे बेळगाव पोलीस आयुक्त एस. रवी यांनी बंड्या कोरगावकर यांचे खास अभिनंदन केले.