शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील तरूणीच्या विनयभंग प्रकरणी दोघांना अटक

By admin | Updated: June 14, 2017 13:54 IST

ठाण्यातील तरूणीच्या विनयभंग प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. 12-  ठाण्यामध्ये 7 जून रोजी एका तेवीस वर्षीय तरूणीवर चालत्या रिक्षेत विनयभंग करून तीला रिक्षेतून बाहेर फेकण्यात आलं होतं. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तसंच त्या घटनेतील रिक्षा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. नौपाडा पोलिसांनी ही संपूर्ण कारवाई केली. याप्रकरणी पुढचा तपास सुरू झाला आहे. तरुणीचा विनयभंग करणाऱ्याचं रेखाचित्र काही दिवसांपूर्वी नौपाडा पोलिसांनी जारी केलं होतं. त्याआधारे आरोपींचा शोध सुरू होता. तसंच रेखाचित्राशी मिळत्याजुळत्या ४५० रिक्षाचालकांच्या छायाचित्रांची पडताळणी झाली होती. या संपूर्ण चौकशी नंतर नौपाडा पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आलं आहे. 
  
प्रकरण नेमकं काय ?
7 जून रोजी ठाण्यातील तीनहात नाका येथून रिक्षात बसलेल्या एका २३ वर्षीय तरुणीवर कापूरबावडीच्या उड्डाणपुलावर चालत्या रिक्षातच लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली होती. या तरुणीने मोठ्या धाडसाने रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदाराला जोरदार प्रतिकार केल्यानंतर तिला चालत्या रिक्षातून बाहेर फेकण्यात आले. या घटनेने स्वप्नाली लाड प्रकरणाची घटना ताजी झाल्याने ठाण्यात एकच खळबळ उडाली होती. 
चितळसर-मानपाडा भागात राहणारी तरुणी कामावरून सुटल्यानंतर ७ जून रोजी रात्री ९.३० वा.च्या सुमारास तीनहातनाका येथे रिक्षाची वाट पाहत उभी होती. कासारवडवलीकडे जाणाऱ्या शेअर रिक्षात ती बसली. रिक्षात आधीच खाकी शर्ट घातलेला प्रवासी होता. पातलीपाडा येथे जाणाऱ्या अन्य एका प्रवाशाला नकार देऊन रिक्षा ९.४० वा. निघाली. रिक्षा कॅडबरी उड्डाणपुलावर मधोमध आल्यानंतर आधीच प्रवासी म्हणून बसलेल्याने तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. अनपेक्षितपणे घडलेल्या या प्रकाराचा तिने तीव्रपणे प्रतिकार केला. तेव्हा, त्याने केलेल्या मारहाणीत तिच्या ओठांना आणि डोळ्यांना मार लागला. तशाही अवस्थेत तिने आरडाओरड करून आपल्या वडिलांना फोन लावला. या झटापटीत फोन रिक्षातच पडला. त्याच वेळी अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्याने ‘आता तुला खल्लास करतो, काढ रे सामान,’ अशी धमकीही तिला दिली. दरम्यान, तिने जोरदार प्रतिकार करत आरडाओरड केल्याने रिक्षाचालकाने अखेर ‘सोडून द्या तिला’ असे म्हणत रिक्षाचा वेग काहीसा कमी केला. त्याच वेळी तिच्याशेजारी बसलेल्याने तिला टीसीएस कंपनीच्या गेटजवळ रिक्षाबाहेर ढकलून दिले. तिथे जमलेल्या काही लोकांपैकी एकाच्या मोबाइलवरून तिने ही आपबिती आपल्या घरी कळवली. तिच्या डोक्याला आणि डोळ्याला जबर मार लागला होता.  या प्रकरणी अपहरण करणे, विनयभंग, धमकी देणे आदी कलमांखाली नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.