शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयातून पोबारा करणा-या दोन्ही आरोपींना आजन्म कारावास!

By admin | Updated: July 23, 2016 02:01 IST

शुक्रवारी न्यायालयासमोर पत्करली शरणागती; दोघांसह तिसर्‍या आरोपीसही जन्मठेप

अकोला: डाबकी रोडवरील प्रिया टॉवरमध्ये २00७ मध्ये घडलेल्या एका खून प्रकरणात दोषी सिद्ध झाल्यानंतर गुरुवारी न्यायालयाच्या आवारातून पोबारा करणार्‍या दोन्ही आरोपींनी शुक्रवारी न्यायालयासमोरच शरणागती पत्करली. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने पोबारा करणार्‍या दोन आरोपींसह तिघांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. विजय ऊर्फ पिंटू बोंडे, शेखर शर्मा आणि नीलेश परनाटे अशी तीनही आरोपींची नावे आहेत.बाश्रीटाकळी तालुक्यातील सिंदखेड येथील विनोद काशिराम डोंगरे यांना नऊ आरोपींनी २९ जुलै २00७ रोजी जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या डाबकी रोड भागातील प्रिया टॉवर येथे बेदम मारहाण केली होती. आर्थिक देवाणघेवाणीतून झालेल्या या मारहाणीत विनोद डोंगरे यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी विजय पांडुरंग गावंडे रा. सिंदखेड, ता. बाश्रीटाकळी यांच्या फिर्यादीवरून पिंटू ऊर्फ विजय बोंडे, शेखर ओमप्रकाश शर्मा, प्रशांत सुधाकर मोरे, नीलेश विश्‍वंभर परनाटे, अजय नारायण देवकते, संजय नारायण देवकते, संदीप रवींद्र टेकाडे, मंगेश वामन म्हैसने, संदीप दीपक मोरे यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानानुसार गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली होती. जुने शहर पोलिसांनी प्रकरणाचा तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू असतानाच गुरुवार, २१ जुलै रोजी पिंटू बोंडे व नीलेश परनाटे या दोघांना दोषी ठरविताच त्यांनी न्यायालयातून पळ काढला होता; मात्र दुसर्‍याच दिवशी शुक्रवारी दोन्ही आरोपी न्यायालयासमोर शरण येताच न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्या न्यायालयाने नऊ साक्षीदार तपासल्यानंतर त्यांच्या न्यायालयाने पिंटू ऊर्फ विजय बोंडे, शेखर ओमप्रकाश शर्मा आणि नीलेश परनाटे या तिघांना शुक्रवारी कलम ३0२ आणि १२0 ब अन्वये दोषी ठरवित जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अँड. राजेश्‍वर ऊर्फ गिरीश देशपांडे यांनी कामकाज पाहिले. (प्रतिनिधी)-----------------------सहा आरोपींची निर्दोष मुक्तताविनोद डोंगरे खून प्रकरणातील तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर पुराव्यांअभावी सहा आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. यामध्ये अजय नारायण देवकते, संजय नारायण देवकते, संदीप रवींद्र टेकाडे, मंगेश वामन म्हैसने, संदीप दीपक मोरे यांचा समावेश आहे.