शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

बोर घाट लवकरच प्रवाशांसाठी होणार खुला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 07:04 IST

काम ७५ टक्के पूर्ण; १५ जानेवारीला मुंबई-तिसरी मार्गिका सुरू करण्याचे नियोजन

मुंबई : मुंबई ते पुणे तिसऱ्या मार्गिकेचे काम जोरात सुरू आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात ही मार्गिका प्रवाशांसाठी खुली करण्यात येईल. बोर घाटातील काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. तर, उर्वरित काम आणि चाचणी घेऊन ही मार्गिका लवकरात लवकर म्हणजे १५ जानेवारीपासून सुरू करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.सप्टेंबर-आॅक्टोबर २०१९ दरम्यान पडलेल्या मुसळधार पावसाने मंकी हिल ते नागनाथ या दोन स्टेशनच्या मधील दक्षिण घाट परिसरातील मुंबई दिशेकडील रेल्वे मार्ग वाहून गेला. रेल्वे रुळांखालील खडी, रेती वाहून गेली. त्यामुळे ३ आॅक्टोबरपासून तिसरी मार्गिका पूर्णपणे बंद करून दुरुस्तीचे काम सुरू केले. आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये हा मार्ग बंद असल्याने रेल्वेच्या इतिहासातील पहिल्यांदाच इतका मोठा ब्लॉक ठरला आहे.दोन टनेलच्या मध्ये एकीकडे टेकडी असलेला डोंगर भाग तर दुसरीकडे दरी या दोन्हीच्या मध्यभागी असलेला रेल्वे मार्ग उभा करणे आव्हानात्मक आहे. रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच या मार्गावर इतका मोठा ब्लॉक घेऊन कामे केली जात आहेत.मंकी हिल ते नागनाथ येथील वाहून गेलेल्या मार्गात खांब उभारण्यात आले आहेत. यावर रेल्वे रूळ टाकण्यात आले आहेत. कमी जागेत खोदकाम करून सुरक्षितरीत्या काम केले जात आहे. रेल्वे कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहेत. त्यामुळे ही मार्गिका लवकर खुली होईल, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. आता या ठिकाणाहून इंजीन चालवून चाचणी घेण्यात येणार आहे.कामाच्या ठिकाणी गर्डर दाखलबोर घाटातील काम युद्धपातळीवर सुरू आहे. या मार्गिकेसाठी लागणारे गर्डर कामाच्या ठिकाणी आणण्यात आले आहेत. लवकरच हे गर्डर टाकण्यात येणार आहेत. मुंबई ते पुणे तिसºया मार्गिकेचे काम १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य निर्धारित आहे.- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे