शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

सीमेवर तणाव; अधिवेशन गुंडाळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 05:55 IST

मुंबई : सीमेवरील तणावच्या स्थितीमुळे महाराष्ट्रातही रेड अलर्ट आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या गुरुवारी, २८ फेब्रुवारी रोजीच गुंडाळण्यात येणार ...

मुंबई : सीमेवरील तणावच्या स्थितीमुळे महाराष्ट्रातही रेड अलर्ट आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या गुरुवारी, २८ फेब्रुवारी रोजीच गुंडाळण्यात येणार असल्याचे सूत्राकडून समजते.

बुधवारी अंतरिम अर्थसंकल्प सादर होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेत्यांना चिठ्ठी पाठवून सर्वपक्षीय बैठकीबाबत कळविले. मुंबईचे पोलिस आयुक्त सुबोध जैस्वाल यांनाही विधानभवनात पाचारण करण्यात आले होते. अधिवेशनाचे काम संपल्यानंतर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दालनात बैठक झाली. त्यास अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे नेते दिवाकररावते, विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजितपवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शेकापचे जयंत पाटील, एमआयएमचे इम्तियाज जलील आदी उपस्थित होते.

राज्यात हाय अलर्ट आहे. मोठया प्रमाणावर ‘इनपूट’ येत आहेत. त्यामुळे अधिकारी आणि पोलिस बलाचा उपयोग अन्यत्र करावा लागणार आहे. अधिवेशनासाठी ५ हजार पोलिसांचे बळ वापरले जात आहे. त्यामुळे सुरक्षेवरचा ताण वाढू शकतो, म्हणून अधिवेशन उद्या अंतरिम अर्थसंकल्प मंजूर करुन संपवून टाकू, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी बैठकीत केली असल्याचे समजते.आजच बजेटला आणि लेखानुदानाला मंजुरीअर्थसंकल्पीय अधिवेशन आजच संपणार हे रात्री उशिरा स्पष्ट झाले, कारण उद्याच्या कार्यक्रम पत्रिकेत अर्थसंकल्पावरील चर्चेचा पहिला व शेवटचा दिवस दाखवला आहे. अर्थसंकल्प मंजुरी व लगेचच लेखानुदानास मंजुरीही शुक्रवारी दाखवली आहे, शिवाय दुष्काळावरील चर्चाही कामकाजात दाखवलेली नाही.