शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी सूत गिरण्यांना बूस्टर डोस; सरकार ४५ टक्के भागभांडवल देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 08:20 IST

वीज सवलतीचा कालावधीही वाढवणार, वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पार पडलेल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

दीपक भातुसेमुंबई : राज्यातील अडचणीत असलेल्या सहकारी सूतगिरण्या आणि यंत्रमाग पूर्ण क्षमतेने सुरू राहण्यासाठी राज्य सरकार संपूर्ण सहकार्य करणार असून, या उद्योगाला बूस्टर डोस ठरेल, असे निर्णय मंत्रालयात वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आले. आर्थिक अडचणीतील सूतगिरण्यांना सरकारच्या भागभांडवलाचा ४५ टक्के हिस्सा राज्य सरकार देणार आहे. विशेष म्हणजे, कर्ज काढून हे भागभांडवल पुरवले जाणार आहे.

बुधवारी झालेल्या या बैठकीला वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, वस्त्रोद्योग आयुक्त शीतल उगले आणि अधिकारी उपस्थित होते. सूतगिरण्यांना वीज बिलात दिली जाणारी ३ रुपयांची सवलत आणखी एक वर्ष वाढवण्याचा निर्णयही बैठकीत झाला. याशिवाय अडचणीतील प्रत्येक सूतगिरणीचा अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक केली जाणार आहे. ही सल्लागार समिती राज्य  सरकारला अहवाल देणार आहे. त्यानुसार या सूतगिरण्यांच्या अडचणी दूर केल्या जाणार आहेत.

सूतगिरण्यांकडून घेतल्या जाणाऱ्या कर्जाच्या व्याजाला सरकारतर्फे १२ टक्क्यांपर्यंत व्याज हमी दिली जाते. याची मुदत मार्च २०२३ रोजी संपत आहे. त्याची मुदत वाढवण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. राज्यातील ३० सूतगिरण्या बंद आहेत. त्या भाडेतत्त्वावर देण्याचा किवा ‘वन टाईम सेटलमेंट’ करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. राज्यात कापसाच्या ८५ लाख गाठींचे उत्पादन होते. यातील ३० टक्के गाठी या महाराष्ट्रातील सूतगिरण्यांसाठी जातात, तर उर्वरित कापूस हा महाराष्ट्राबाहेर जातो. हा कापूस महाराष्ट्रातच कसा राहील, यासाठीही एक समिती स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला. 

नव्या वस्त्रोद्योग धोरणासाठी समिती राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणाची मुदत मार्च २०२३ मध्ये संपत आहे. नवे वस्त्रोद्योग धोरण तयार करण्यासाठी वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाणार आहे. ही समिती इतर राज्यातील आणि देशातील वस्त्रोद्योग धोरणांचा अभ्यास करून सर्वंकष असे नवे वस्त्रोद्योग धोरण तयार करणार आहे.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटील