शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात पुस्तकवाचनाची वारी : कोथरुड भागात आगळा-वेगळा बुक कॅफे

By admin | Updated: November 3, 2016 08:50 IST

रुणाईला भावणारे वातावरण निर्माण करून त्यांना वाचनासाठी प्रवृत्त करण्यासाठी पुण्यातील कोथरुड परिसरात बुक कॅफे सुरू झाला आहे.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ३ - तरुणांनी वाचनसंस्कृती जोपसावी अशी अपेक्षा केली जाते, मात्र तरुणाईला भावेल असे वातावरण ग्रंथालयांमध्ये अपवादानेच लाभते. त्यामुळे ही तरुणाई सीसीडी, बरिस्ता, स्टारबक्समध्ये आनंद शोधायला जाते. याला छेद देऊन तरुणाईला भावणारे वातावरण निर्माण करून त्यांना वाचनासाठी प्रवृत्त करण्यासाठी पुण्यातील कोथरुड परिसरात बुक कॅफे सुरू झाला आहे. 
तरुणांच्या मनाचा वेध घेऊन, तरुणांना त्यांच्या आवडीने, बळजबरी न करता  कश्या प्रकारे वाचनाकडे वळवता येईल याचा विचार पुण्याच्या सती भावे यांनी केला. त्यांच्या कल्पनेतून साकार झाला 'वारी बुक कॅफे अ‍ॅण्ड क्रिअ‍ेटिव्ह स्पेस'. धावपळीच्या, धकाधकीच्या आयुष्यातून लोकांना काही काळासाठी निवांतपणा मिळावा,शांतता मिळावी यासाठी एखादी त्यांच्या हक्काची जागा असावी असे वाटले. यातूनच बुक कॅफे सुरु करण्याची कल्पना त्यांना सुचली. पुण्याच्या कोथरुड भागात हा बुक कॅफे सुरु करण्यात आला आहे. येथे साहित्य,वैचारिक, ललित, कथा, कांदब-या, मनोविज्ञान, तत्त्वज्ञान अश्या विषयांवरील पुस्तके उपलब्ध आहेत. कॉफीचा आस्वाद घेत तासन-तास पुस्तके येथे वाचता येतात. लहान मुलांच्या गोष्टी-कथांची पुस्तकेही येथे आहेत. येथे बसून वाचण्यासाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येत नाही.सकाळी ११ ते रात्री १० पर्यंत हा कॅफे सुरु असतो.
 
शांत वातावरण, मंद आवाजात लावण्यात येणारे शास्त्रीय संगीत, विविध फुलांच्या कुंड्या, विविध आकर्षक कंदिलांमध्ये लावण्यात आलेले दिवे, भारतीय बैठकीची सोय, आकर्षक चित्रांच्या लटकवलेल्या फ्रेम्स यांमुळे हा कॅफे तरुणांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू झाला आहे. अनेक तरुण आर्वजून या कॅफेला भेट देत आहेत. ताणतणावातून निवांत वाचन करण्यासाठी ते या जागेला पसंती देत आहेत. त्याचबरोबर शांतपणे बसून खेळता येण्यासारख्या खेळांचे साहित्यही ठेवण्यात आले आहे. या कॅफेविषयी सांगताना सती भावे म्हणाल्या, शहरातील लोकांना शहरी जीवनाच्या धावपळीतून बाजूला होऊन एखादं विसाव्याचं ठिकाण मिळावं की जिथे त्यांना आपल्या पुस्तकांबरोबर,छंदांबरोबर चिंतनासाठी वेळ घालवता यावा, शांत होता यावं यासाठी या बुक कॅफेची निर्मिती करण्यात आली आहे.
 
बुक कॅफे ही संकल्पना मी पहिल्यांदाच ऐकली आणि मला फारच आवडली. बुक कॅफे सारखा उपक्रम खबप चांगला आहे.मला इथे बसल्यावर शांतता मिळते. विविध विषयावरील पुस्तकं इथे असल्याने वाचनाची गोडीही निर्माण होण्यास मदत होत आहे.
- स्पृहा कुलकर्णी, तरुण वाचक