शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

नववीचे इतिहासाचे पुस्तक वादाच्या भोवऱ्यात

By admin | Updated: July 4, 2017 04:59 IST

भारताचे माजी पंतप्रधान आणि संगणकपर्वाचे प्रणेते राजीव गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह उल्लेख असल्याने इयत्ता नववीचे ‘इतिहास व राज्यशास्त्र’ हे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : भारताचे माजी पंतप्रधान आणि संगणकपर्वाचे प्रणेते राजीव गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह उल्लेख असल्याने इयत्ता नववीचे ‘इतिहास व राज्यशास्त्र’ हे पुस्तक वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या गोष्टीचा तीव्र निषेध करून हा चुकीचा इतिहास तातडीने बदलावा, अशी मागणी पुणे शहर काँग्रेसने केली आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून नववीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला असून, नवी पुस्तके नुकतीच बाजारात आली आहेत. इतिहासाच्या पुस्तकातील एका धड्यात राजीव गांधींबद्दल आक्षेपार्ह सोयीचे लिखाण करण्यात आले आहे. ‘‘माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कारकिर्दीत बोफोर्स कंपनीकडून घेण्यात आलेल्या लांब पल्ल्याच्या तोफ खरेदीसंदर्भात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात राजीव गांधी यांच्यावर बरीच टीका झाली. राजकीय भ्रष्टाचार हा या काळातील निवडणुकांचा एक महत्त्वाचा मुद्दा बनला आणि सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला.’’ असे या पुस्तकात म्हटले आहे. मात्र, बोफोर्स तोफ खरेदी प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने राजीव गांधी निर्दोष असल्याचा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाची माहितीही या पुस्तकात देण्यात आलेली नाही. पुस्तकामध्ये १९९१नंतरचे बदल, या परिच्छेदामध्ये माजी पंतप्रधान दिवंगत नरसिंह राव यांचे छायाचित्र छापण्यात आलेले नाही. राव यांच्या १९९१ ते १९९५ या कारकिर्दीत रामजन्मभूमी व बाबरी मशिदीचा प्रश्न ऐरणीवर आला, असे म्हटले आहे. मात्र बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी भाजपाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, माजी मंत्री मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या त्यांच्यावर लखनऊच्या न्यायालयात खटला सुरू आहे, याचा उल्लेख टाळण्यात आला आहे. या गोष्टींवर आक्षेप नोंदवत विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असून, चुकीचा इतिहास लिहिणे कदापि सहन करणार नाही, असा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी दिला आहे. याबाबत शिक्षण आयुक्तांना निवेदनही देण्यात आले आहे. विषय समितीपुढे मांडू नववीच्या इतिहास पुस्तकातील काही लिखाणाबद्दल घेण्यात आलेला आक्षेप संबंधित विषय समितीपुढे मांडला जाणार आहे. त्याबाबत विषय समितीकडून योग्य तो निर्णय घेतला जाईल. अभ्यासक्रमामध्ये बदल करण्याचे सर्वस्वी अधिकार या विषय समितीला आहेत.- सुनील मगर, संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ