शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बाजोरियांच्या मंत्रिपदासाठी मुंबईत लॉबिंग!

By admin | Updated: April 6, 2017 00:25 IST

अकोला- पश्चिम विदर्भातील शिवसेनेचे ज्येष्ठ विधान परिषद आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या वाटेला कॅबिनेट मंत्रिपद यावे, यासाठी मुंबईत लॉबिंग सुरू झाली आहे

पश्चिम विदर्भातील शिवसेना जिल्हाप्रमुख मुंबईकडे रवानाअकोला : शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री कामे करीत नसल्याच्या तक्रारींचा ओघ वाढत असल्याचे पाहून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मोठे फेरबदल करणार असल्याचे संकेत आहेत. त्या पृष्ठभूमीवर पश्चिम विदर्भातील शिवसेनेचे ज्येष्ठ विधान परिषद आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या वाटेला कॅबिनेट मंत्रिपद यावे, यासाठी मुंबईत लॉबिंग सुरू झाली आहे. त्याकरिता अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातून सेनेचे जिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी बुधवारी मुंबईकडे रवाना झाले आहेत. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका, जिल्हा परिषद तसेच नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेची पीछेहाट झाल्याचे चित्र समोर आले. दहा महापालिकांपैकी शिवसेनेला मुंबई आणि ठाणे या दोन मनपात तारेवरची कसरत करून सत्ता राखता आली. निवडणुकीच्या कालावधीत त्या-त्या भागात एकही मंत्री फिरकला नाही. याशिवाय ज्या आमदारांची कॅबिनेट मंत्रिपदावर वर्णी लागली, ते मंत्री पक्षातील आमदारांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची कामे करीत नसल्याच्या पक्षाकडे तक्रारी वाढल्या. हातात सत्ता असूनही कामे होत नसल्याचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीवर होण्याची दाट शक्यता लक्षात घेता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्र्यांची उचलबांगडी करण्याचे संकेत दिले आहेत. पश्चिम विदर्भातील विधान परिषदेचे ज्येष्ठ आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या वाटेला कॅबिनेट मंत्रिपद यावे, यासाठी मुंबईत हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. बुधवारी रात्री शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, श्रीरंग पिंजरकर, उपजिल्हाप्रमुख बंडूभाऊ ढोरे, रवींद्र पोहरे, दिलीप बोचे, निवासी उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर, शहर प्रमुख राजेश मिश्रा, अतुल पवनिकर, संतोष अनासने, उपशहर प्रमुख अभिषेक खरसाडे मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती आहे. त्यापाठोपाठ बुलडाणा तसेच वाशिम येथील सेनेचे जिल्हाप्रमुख, नगराध्यक्ष अशोक हेडाही रवाना झाले आहेत.पश्चिम विदर्भाची झोळी रिकामी! कधीकाळी पूर्व आणि पश्चिम विदर्भातून शिवसेनेचे आमदार निवडून यायचे. आज रोजी यवतमाळचे एकमेव राज्यमंत्री संजय राठोड वगळता मंत्रिपदासाठी पश्चिम विदर्भाची झोळी रिकामी असल्याचे दिसून येते. प्रश्न निकाली काढणारा आमदार! अधिवेशन काळात अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे विविध प्रश्न, समस्या निकाली काढणारा आमदार अशी बाजोरियांची ओळख आहे. या बाबीचा बाजोरियांना फायदा मिळतो का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.