शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गर्भनिरोधक गोळ्यांची बिनधास्त विक्री

By admin | Updated: May 20, 2016 02:25 IST

औषध दुकानाच्या काउंटरवर बिनधास्तपणे गर्भनिरोधक औषध, गोळ्या घेण्यास येणाऱ्या तरुणी दिसून येऊ लागल्याने आश्चर्य व्यक्त होऊ लागले

संजय माने,

पिंपरी-पान टपरीवर सिगारेट शिलगावणाऱ्या, कधी हुक्का फ्लेवर घेण्यासाठी थांबणाऱ्या युवती हे दृश्य नेहमीचे झाल्याने त्यातील कुतूहल उरले नाही. अलीकडच्या काळात औषध दुकानाच्या काउंटरवर बिनधास्तपणे गर्भनिरोधक औषध, गोळ्या घेण्यास येणाऱ्या तरुणी दिसून येऊ लागल्याने आश्चर्य व्यक्त होऊ लागले आहे. मोठ्या औषध दुकानांतून रोज किमान चार ते पाच तर छोट्या दुकानांमधून किमान दोन अशा प्रमाणात गर्भनिरोधक गोळ्यांची विक्री होत आहे. गर्भनिरोधक गोळ्या खरेदी करणाऱ्यांमध्ये १७ ते ३२ वयोगटातील अविवाहित युवती, महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे प्रमाण अधिक असल्याने याबद्दल चिंता व्यक्त होऊ लागली आहे. गर्भपात करण्याची वेळ येऊ नये, याची दक्षता म्हणून बाजारात मिळणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्यांचा पर्याय तरुणींनी स्वीकारला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशा प्रकारे औषध-गोळ्या घेणे धोकादायक ठरू शकते, हे माहिती असूनही अनेक युवती औषध दुकानातून आणलेल्या गर्भनिरोधक गोळ्या घेऊन वेळ मारून नेत आहेत. लोकसंख्या नियंत्रणाच्या दृष्टीने कुटुंब नियोजनाकरिता औषध दुकानांमध्ये उपलब्ध करून दिलेली गर्भनिरोधक साधने, गोळ्यांचा वापर दुसऱ्याच कारणासाठी केला जात आहे. तरुण-तरुणींमधील प्रेमसंबंधाचे रूपांतर पुढे शारीरिक आकर्षणात होते. विवाहापूर्वी काही अनुचित प्रकार घडू नये, याची दक्षता म्हणून गर्भनिरोधक गोळ्या खाण्याकडे तरुणींचा कल दिसून येतो. अशा प्रकारे गोळ्या खाणे शारीरिकदृष्ट्या दुष्परिणाम करणारे ठरणारे असले, तरी झालेल्या चुकीवर उपाय म्हणून अशा गोळ्या खाण्याची जोखीम पत्करणाऱ्या तरुणींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. औषध दुकानांमध्ये सहज मिळणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्यांचा एक प्रकारे गैरवापर होत आहे. औषध दुकानांमधून विक्री होणाऱ्या गोळ्या, औषधांची नोंद होत नाही. किशोरवयीन मुलीसुद्धा स्वत: दुकानाच्या काउंटरवरून गर्भनिरोधक गोळ्या घेऊन जाताना दिसून येतात. हिंजवडी आयटी परिसर, तसेच औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण-तरुणींचे प्रमाण अधिक आहे. हिंजवडी, वाकड, पिंपळे गुरव, काळेवाडी, तसेच भोसरी, पिंपरी परिसरातील औषध दुकानांमधून गर्भनिरोधक गोळ्या विक्रीचे प्रमाण अधिक असल्याचे औषध दुकानदार सांगतात.