अचलपूर (जि़अमरावती) : शेतात मक्याच्या पिकाची कापणी करीत असताना जमिनीत गाडलेल्या एका टणक वस्तूला विळा लागल्याने अचानक स्फोट झाला. यात दोन मजूर जखमी झाले. चांदूरबाजार तालुक्यातील करजगाव येथे शनिवारी दुपारी ४ वाजता ही घटना घडली. आफिज शेख मजिद व शाहजाद खाँ अहेवर खाँ (रा.फटापुरा) अशी जखमींची नावे आहेत. या शेतातून २८ गावठी बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. शिरजगाव पोलिसांनी शेतात रखवालीचे काम करणाऱ्या प्रकाश मोहन धुर्वे (३२) याला अटक केली आहे़
करजगावात गावठी बॉम्बचा स्फोट
By admin | Updated: May 4, 2015 01:31 IST