शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

बॉम्बे वेलप्रिंट इंकला एसएमई पुरस्कार

By admin | Updated: September 4, 2014 00:56 IST

बॉम्बे वेलप्रिंट इंक प्रा.लिमिटेडला एसएमई पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार बँक आॅफ इंडियाच्या वतीने आणि एसएमई फोरम आॅफ इंडियाच्या सहकार्याने मुंबई येथे अलीकडेच आयोजित समारंभात बॉम्बे वेलप्रिंट

देशातील एकमेव कंपनी : ६२ हजार प्रवेशिकानागपूर : बॉम्बे वेलप्रिंट इंक प्रा.लिमिटेडला एसएमई पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार बँक आॅफ इंडियाच्या वतीने आणि एसएमई फोरम आॅफ इंडियाच्या सहकार्याने मुंबई येथे अलीकडेच आयोजित समारंभात बॉम्बे वेलप्रिंट इंकचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवी गांधी यांनी स्वीकारला. अध्यक्षस्थानी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन होत्या. मंचावर एमएसएमईएसचे केंद्रीय मंत्री कलराज मिश्रा आणि बँक आॅफ इंडियाच्या अध्यक्षा व्ही. राजलक्ष्मी अय्यर होत्या. या पुरस्कारासाठी यावर्षी देशातून एमएसएमई क्षेत्रातून ६२ हजार प्रवेशिका आल्या होत्या. त्यातून बँक आॅफ इंडिया आणि एसएमई फोरम आॅफ इंडियाने १०० सर्वोत्तम उद्योजकांची निवड केली. विदर्भातून एसएमई क्षेत्रातून केवळ बॉम्बे वेलप्रिंट इंकला हा पुरस्कार मिळाला आहे. शिवाय संपूर्ण देशात एसएमई क्षेत्रात पुरस्कार मिळविणारी पहिली प्रिंटिंग इंक उत्पादक कंपनी आहे. बॉम्बे वेलप्रिंंट इंकची स्थापना १९९३ मध्ये झाली. उच्च दर्जाची प्रिंटिंग इंकची निर्मिती करते. स्थापनेवेळी दरमहा २० मेट्रिक टन उत्पादन क्षमता होती. ती वाढून आता दरमहा ५०० मेट्रिक टनवर गेली आहे. कंपनी लो वोलॅटाईल आॅर्गनिक कम्पाऊंड (व्हीओसी) इंकचे उत्पादन करते. हे उत्पादन प्रिटिंंग कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्वोत्तम आणि पर्यावरणाला पूरक आहे. यावर्षीच्या अखेरीस उत्पादन क्षमता दुपटीवर नेण्याचा कंपनीचा संकल्प आहे. लोकमत ग्रुप आॅफ न्यूजपेपर, बेनेट कोलमन अ‍ॅण्ड कंपनी, राजस्थान पत्रिका, इंडियन एक्स्पे्रस, डीएनए आणि विविध संस्थांना कंपनी इंकचा पुरवठा करते. (प्रतिनिधी)