शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील 48 इमारती पाडा; मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 14:53 IST

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आसपास असलेल्या टोलेजंग इमारतींबाबत उच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. तसेच, डीजीसीएच्या आदेशाचे तातडीने पालन करण्यास सांगितले आहे.

मुंबई: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आसपास असलेल्या टोलेजंग इमारतींबाबत उच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. विमानतळाच्या आजुबाजूला असलेल्या 48 इमारती पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने डीजीसीएच्या आदेशाचे तातडीने पालन करण्यास सांगितले आहे. ANI वृत्तसंस्थेने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असलेल्या इमारतींबाबत हे आदेश आहेत. या इमारतींचे ते भाग पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत, ज्यांची उंची परवानगी मर्यादेपेक्षा जास्त आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या आदेशाचे पालन करून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील 48 उंच इमारतींचे भाग तातडीने पाडण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठराविक उंचीपेक्षा जास्त बांधकाम केलेले भाग पाडण्यात येणार आहेत. मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने ही जबाबदारी बृहन्मुंबई महानगरपालिकेवर ठकवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल जिल्हाधिकार्‍यांवर ताशेरे ओढले. तसेच, या धोकादायक इमारतींबाबत निर्णय घ्यावा असेही सांगितले. ज्या इमारतींना उंचीचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे, त्या इमारतींचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याची सूचनाही न्यायालयाने अधिकाऱ्यांना केली आहे. 

टॅग्स :AirportविमानतळMumbaiमुंबईHigh Courtउच्च न्यायालय