शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बोगस नावे मतदारांच्या गळ्यात

By admin | Updated: May 4, 2017 06:04 IST

तुमचे नाव मतदार यादीत दोनदा असेल तर तुम्ही नेमके कोणत्या ठिकाणी मतदान करणार किंवा कोणत्या मतदानकेंद्रावर

भिवंडी : तुमचे नाव मतदार यादीत दोनदा असेल तर तुम्ही नेमके कोणत्या ठिकाणी मतदान करणार किंवा कोणत्या मतदानकेंद्रावर मतदान करणार ते आम्हाला पाच दिवसांत लेखी कळवा, अशी जाहिरात प्रसिद्ध करून भिवंडी पालिकेतील निवडणूक विभागाने यादीतील बोगस नावांवर तोडगा काढला आहे. या नावांवर खुणा करून याद्या प्रसिद्ध करा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले असतानाही निवडणूक विभागाने बोगस नावांची जबाबदारी मतदारांच्या खांद्यावर टाकली आहे. पालिकेच्या या कृतीविरोधात याचिकाकर्त्यांनी संताप व्यक्त केला असून हा न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.मतदारयादीत निम्मी नावे बोगस असल्याचा आरोप करणारी आणि दोन मतदारसंघांत ग्रामीण भागातील नावे घुसवल्याचा आरोप करणाऱ्या याचिका दाखल झाल्यावर अशा सदोष याद्या असतानाही निवडणूक का जाहीर केली, असा प्रश्न न्यायालयाने विचारला होता. त्यानंतर अशा नावांवर खुणा करून नव्याने याद्या प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते. त्यावर पालिकेच्या निवडणूक विभागाने जाहिरात प्रसिद्ध करून ज्यांची नावे यादीत दुसऱ्यांदा आली आहेत, त्यांना ३ ते ७ मे दरम्यान पालिकेत येऊन नेमक्या कोणत्या मतदारसंघात आणि कोणत्या मतदानकेंद्रात मतदान करणार ते कळवण्यास सांगितले आहे. त्याला प्रतिसाद न मिळाल्यास मतदानावेळी दुबार नावांमुळे प्रचंड गोंधळ उडण्याची, मोठ्या प्रमाणात बोगस मतदान होण्याची शक्यता आहे. ज्या कारणासाठी मतदारयादीला आव्हान देण्यात आले होते आणि न्यायालयाने याद्यांवर खुणा करण्याचा आदेश दिला होता, ते न करता पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जाहिरात प्रसिद्ध करून आपली सुटका करून घेतली आहे. केंद्रनिहाय यादीत अद्याप दुबार नावांसमोर खुणा करण्यात आलेल्या नाहीत, अशी कबुली निवडणूक विभागप्रमुख श्रीकांत औसरकर यांनी दिली.राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी मात्र दुबार नावे काढणे ही पालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील विभागाची जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचवेळी या याद्या जानेवारीत तयार केल्या असून सप्टेंबरमध्येच त्यावर हरकती-सूचना मागवल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भिवंडीच्या निम्म्या मतदारसंघांत बोगस नावे असल्याचा आरोप करणाऱ्या याचिका दाखल झाल्यानंतर आणि ग्रामीण भागातील नावे घुसवण्यात आल्याचा आरोप केल्यानंतर ही नावे वगळण्यासाठी न्यायालयाने मतदारयाद्यांवर खुणा करण्याचे आदेश दिले होते. त्यातून यादीत दुसऱ्यांदा आलेली नावे समजतील, हा हेतू होता. मात्र अशा खुणा न करताच याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. उलट निवडणूक विभागाने मतदारांनाच आवाहन केले. ७ एप्रिलला याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. त्यावर २४ एप्रिलला न्यायालयाच्या निर्णयानंतर निवडणूक आयोगाने आदेश काढला असून त्यानुसार ३ ते ७ मे दरम्यान मतदारांनी येऊन कुठे मतदान करणार ते कळवावे, असे पालिकेच्या निवडणूक विभागाने जाहीर केले. वस्तुत: बोगस आणि दुबार नावांसमोर खूण करून ती यादी ६ मे पर्यंत प्रसिध्द करावी, असे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने राज्य व केंद्रीय निवडणूक आयोगाला दिल्यानंतरही त्यानुसार मतदारयादी दुरूस्त करण्यात आलेली नाही. पालिकेच्या या कारभाराविरोधात याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पवित्रा घेतला आहे. पण त्यांना आणि राज्य निवडणूक आयोगालाही अद्याप उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत मिळालेली नाही. दरम्यान, निवडणूक आयुक्त सहारिया यांनी बुधवारी सायंकाळी भिवंडीला भेट देऊन निवडणूक तयारीचा आढावा घेतला. हा कोर्टाचा अवमानउच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक यंत्रणा काम करत नाही. दुबार मतदारांना आपल्या कार्यालयांत येऊन ते कोणत्या केंद्रातून मतदान करणार असल्याचे नोंद करण्यास ते सांगत आहेत. तशी जाहिरात निवडणूक विभागाने वर्तमानपत्रात दिली. त्यामुळे कोर्टाचा अवमान होतो आहे.- सिध्देश्वर कामूर्ती, याचिकाकर्तेकाय घडले होते? संजय काबुकर, सिध्देश्वर कामूर्ती आणि फाजील अन्सारी यांनी उच्च न्यायालयांत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर २६ एप्रिलला निकाल देताना उच्च न्यायालयाने या नावांसमोर ६ मे पूर्वी खुणा करून नंतरच त्या याद्या प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते. बोगस मतदारांचे काय?पालिकेने प्रसिध्द केलेल्या मतदारयादीत दुबार मतदारांसह बोगस नावे आहेत. ग्रामीण भागातील नावे घुसडण्यात आली आहेत. त्याबाबत आमची निवडणूक आयोगाकडे तक्रार होती. दुबार नावांसमोर खुणा करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला असला, तरी बोगस नावांचा विषय अनुत्तरीत आहे. त्यामुळे हे मतदान पारदर्शक होईल, असे कसे म्हणता येईल? एकीकडे मतदान प्रक्रिया सुरू आहे. मात्र उच्च न्यायालयाचा लेखी निर्णय न मिळाल्याने पुढील हालचाली थांबल्या आहेत.- संजय काबूकर, याचिकाकर्तेखुणा करून काय होणार? : भिवंडी महानगरपालिकेच्या मतदारयादीतील दुबार नावांबाबत आमची तक्रार होती. त्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर २६ एप्रिलला न्यायालयाने निकाल दिला, पण त्याने आमचे समाधान झाले नाही. केवळ नावांवर खुणा करून हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी आम्हाला सर्वोच्च न्यायालयात जायचे आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक यंत्रणा काम करीत नसेल, तर आम्ही अवमान याचिकाही दाखल करू. - फाजील अन्सारी, याचिकाकर्ता