शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

बॉडीबिल्डरची हत्या

By admin | Updated: January 14, 2015 00:48 IST

गुंडांनी जुन्या वैमनस्यातून एका बॉडीबिल्डर तरुणाची दिवसाढवळ्या सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास धारदार व तीक्ष्ण शस्त्रांनी भोसकून हत्या केली. ही घटना धरमपेठ भागात घडली.

धरमपेठेत भरदिवसा थरार : उपराजधानीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्ननागपूर : गुंडांनी जुन्या वैमनस्यातून एका बॉडीबिल्डर तरुणाची दिवसाढवळ्या सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास धारदार व तीक्ष्ण शस्त्रांनी भोसकून हत्या केली. ही घटना धरमपेठ भागात घडली. या घटनेमुळे या भागात भयग्रस्त वातावरण पसरले असून पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.धरमपेठ परिसरात गत सव्वा महिन्यात घडलेली भीषण खुनाची ही दुसरी घटना होय. रितेश रमेश बैसवारे (३०), असे मृत तरुणाचे नाव असून तो आमदारनिवासमागील झोपडपट्टीतील रहिवासी होता. हा खून कुख्यात अश्विन तुर्केल, निखिल डागोर आणि त्याच्या साथीदारांनी केल्याचे बोलले जात असून अद्याप कोणीही पोलिसांना गवसलेला नाही. प्राप्त माहितीनुसार रितेश याचे अमरावती मार्गावर अर्बन वेअर्स नावाचे तयार कपड्याचे दुकान होते. गत चार-पाच महिन्यांपासून त्याचे वाल्मिकीनगर येथील अश्विनी तुर्केल याच्यासोबत वैमनस्य होते. त्यापूर्वी दोघांचे परस्परात चांगले संबंध होते. अश्विनी सीताबर्डी-अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी करायचा. तो खंडणी वसूल करायचा. मृत रितेश हा बॉडीबिल्डर होता. त्याचीही चलती होती. त्याची ही चलती सहन न झाल्याने अश्विन याने त्याच्याशी वैर पत्करले होते. माहितीगार सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार अश्विन हा शक्तिप्रदर्शन म्हणून रितेशच्या दुकानापुढे धिंगाणा घालायचा. तो नाहकच रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना अडवून त्यांच्या वाहनांचे काच फोडायचा आणि मारहाण करायचा. यावरून त्याचे रितेशसोबत भांडणही झाले होते. काही दिवसांपूर्वी अश्विनला रितेश याने लखनौ येथून देशीकट्टा आणल्याचे समजले होते. त्यामुळे रितेश हा आपला खून करण्याच्या बेतात असल्याचा संशय अश्विनला होता. आपण रितेशच्या हातून मारल्या जाण्यापूर्वीच त्याचा गेम करायचा, अशी योजना अश्विन याने आखली होती. बॉडी बिल्डर रितेश हा रोज सकाळी धरमपेठेतील बारबेरियम जिममध्ये जायचा. आजही तो नेहमीप्रमाणे जिमकडे जाण्यासाठी निघाला होता. परंतु मोटरसायकल नसल्याने त्याने एका मित्राला घटाटे बिल्डिंगपर्यंत सोडून मागितले. या ठिकाणाहून तो विशाल भगत नावाच्या अन्य एका मित्रासोबत त्याच्या अ‍ॅक्टिव्हावर जिमनजीक पोहोचला. अ‍ॅक्टिव्हा पार्क करून हे दोघेही पहिल्या माळ्यावरील बारबेरियम जिमकडे जाऊ लागताच रितेशची प्रतीक्षा करीत असलेल्या अश्विन तुर्केल, डागोर आणि साथीदारांनी त्याला घेराबंदी केली. त्याच्या डोळ्यात मिरची पावडर झोकली. डोळे चोळत तो कसाबसा खाली उतरून रस्त्याकडे पळू लागताच हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग सुरू केला. एका ठिकाणी तो अडखळून पडला. त्याचवेळी हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार व तीक्ष्ण शस्त्रांनी वार करीत त्याच्या देहयष्टीची अक्षरश: चाळण केली. रितेश हा रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्याचे पाहून हल्लेखोर मोटरसायकलींनी पळून गेले. या घटनेबाबत समजताच अंबाझरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लागलीच रितेशला शंकरनगर येथील एका खासगी इस्पितळात नेले. या ठिकाणी डॉक्टरने तपासून त्याला मृत घोषित केले. रितेशच्या खुनामागे नेमके कारण काय ही बाब आरोपी पोलिसांच्या हाती लागल्यानंतरच स्पष्ट होईल. (प्रतिनिधी)मृत्यूनंतरही भोसकले सीसीटीव्हीत कैदमृत्यूनंतरही रितेशच्या देहावर हल्लेखोरांनी शस्त्रांचे वार सुरूच ठेवले होते. ही घटना जिमच्या बाहेर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हल्लेखोरांनी वीसहून अधिक घाव घातले आहेत. ही घटना धरमपेठेतील अति रहदारीच्या रस्त्यावर घडली. त्यामुळे अनेकांनी ‘लाईव्ह मर्डर ’ पाहिला. परंतु कोणीही त्याच्या मदतीला धावून आले नाही. कोणी या घटनेची पोलिसांना खबर करण्याची तसदीही घेतली नाही. त्यामुळे पोलीस उशिरा घटनास्थळी दाखल झाले होते. सव्वा महिन्यापूर्वीही याच भागात घुग्गुस येथील कोलमाफिया सागीर सिद्दिकी याची पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेपूर्वी भाजपचा पदाधिकारी हेमंत दियेवार याची हत्या करण्यात आली होती. रितेशने केली होती आमदार पुत्राला मारहाणचार वर्षांपूर्वी भाजपच्या एका आमदारपुत्राला मारहाण केल्यापासून रितेश हा चर्चेत आला होता. त्याने आपल्या साथीदारांना सोबत घेऊन जीएस कॉलेजचा विद्यार्थी असलेल्या भाजप आमदाराच्या मुलाला मारहाण केली होती. त्याच्याविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात दंगा करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.