शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बॉबी खून प्रकरणातील आरोपींना अलाहाबादमध्ये पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 22:43 IST

लोकमान्यनगर येथील तरसेम सिंग ऊर्फ बॉबी (२५) याचा खून करणाऱ्या शिवम तिवारी, राहुल यादव आणि आकाश निशाद या तिघांनाही ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने थेट अलाहाबाद (उत्तर प्रदेश) येथून शनिवारी ताब्यात घेतले.

ठळक मुद्देनावातील गोंधळामुळे खून...खबऱ्याच्या माहितीवरून लागला शोध ट्रान्सिस्ट कस्टडी घेऊन तिघांनाही सोमवारी ठाण्यात आणणार

जितेंद्र कालेकर

ठाणे : लोकमान्यनगर येथील तरसेम सिंग ऊर्फ बॉबी (२५) याचा खून करणाऱ्या शिवम तिवारी, राहुल यादव आणि आकाश निशाद या तिघांनाही ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने थेट अलाहाबाद (उत्तर प्रदेश) येथून शनिवारी ताब्यात घेतले. त्यांची ट्रान्सिस्ट कस्टडी घेऊन तिघांनाही सोमवारी ठाण्यात आणले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या खुनातील आरोपींना तातडीने अटक करावी, त्यांना फाशी द्यावी, या मागणीसाठी सावरकरनगर येथील रहिवाशांनी लोकमान्यनगर टीएमटी बस डेपो येथून शनिवारी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला.

तत्पूर्वी, या प्रकरणाच्या तपासासाठी वर्तकनगर पोलीस ठाण्याचे दोन, तर गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटचे एक अशा तीन पथकांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता.

तिघेही आरोपी लोकमान्यनगरच्या मामाभाचे डोंगरात पळाल्याची शक्यता लक्षात घेऊन खून झाला, त्याच दिवशी ६ नोव्हेंबर रोजी रात्री १० ते पहाटे उशिरापर्यंत उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे, हवालदार एस.टी. राठोड, नाईक दिलीप शिंदे आदींनी शोध घेतला होता. मात्र, हे त्रिकूट तिथून पसार झाले होते.

तिघेही उत्तर प्रदेशात पळाल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बेंद्रे, हवालदार एस.सी. गोरे, नाईक राजेंद्र गायकवाड आणि दिलीप शिंदे आदींनी त्यांना ११ नोव्हेंबर रोजी अलाहाबाद रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले.

त्यांना रविवारी अलाहाबाद न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांची अलाहाबाद ते ठाणे नेण्याची रीतसर परवानगी न्यायालयातून ठाणे पोलिसांनी घेतली. या तिघांनाही सोमवारी वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नावातील गोंधळामुळे खून...तरसेम सिंग ऊर्फ बॉबी याच्या मैत्रिणीला शिवमने सांगितले की, तू बाबूबरोबर फिरत जाऊ नकोस. तिने बाबूऐवजी बॉबी ऐकले. शिवमने आपल्याला तुझ्याबरोबर फिरू नकोस, असे सांगितल्याचे तिने बॉबीला सांगितले.

याचा जाब विचारण्यासाठी बॉबीने शिवमला बरेच कॉल केले. अनेक मिसकॉल पाहिल्यानंतर शिवमने त्याला फोन केला. तेव्हा शिवमने त्याला सांगितले, मी बॉबी नाही तर बाबू म्हणालो. हवे तर मी तुला प्रत्यक्ष भेटून हे सांगतो. त्यानुसार, ते सावरकरनगर येथील ज्ञानोदय शाळेजवळ भेटले.

बॉबी येताना त्याच्या काही मित्रांना हाणामारी करण्यासाठी घेऊन येईल, अशी भीती शिवमला होती. त्यामुळे शिवम काही मित्रांसह तसेच हत्यार बरोबर घेऊनच गेला. तिथे त्यांच्यात झालेल्या बाचाबाचीनंतर शिवमने थेट बॉबी आणि त्याचा साथीदार अजय सिंग याच्यावर छोट्या तलवारीने पोटावर वार केला.

यात बॉबीचा मात्र मृत्यू झाला. हल्ल्यानंतर पसार झालेल्या शिवमसह तिघांनाही उपनिरीक्षक बेंद्रे यांच्या पथकाने आता अटक केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.

 

टॅग्स :Murderखूनthaneठाणे