शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील रस्ते सुरक्षिततेसाठी ब्लूमबर्ग सहकार्य वाढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 06:24 IST

राज्यातील रस्ते सुरक्षिततेसाठी ब्लूमबर्ग समूहातर्फे देण्यात येत असलेले सहकार्य अधिक व्यापक करण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला.

विशेष प्रतिनिधीमुंबई  -  राज्यातील रस्ते सुरक्षिततेसाठी ब्लूमबर्ग समूहातर्फे देण्यात येत असलेले सहकार्य अधिक व्यापक करण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला. न्यू यॉर्क येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ब्लूमबर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी माईक ब्लूमबर्ग यांच्याशी यासंदर्भात चर्चा झाली.मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील राज्याच्या शिष्टमंडळाचे कॅनडाच्या दौऱ्यावरून गुरुवारी अमेरिकेतील न्यू जर्सी येथे आगमन झाले. भारताचे न्यू यॉर्कमधील कॉन्सुल जनरल संदीप चक्रवर्ती यांनी त्यांचे स्वागत केले. महाराष्ट्रासोबतच्या सहकार्याची व्याप्ती वाढवितानाच राज्याच्या फिनटेक क्षेत्रातील स्टार्टअप कंपन्यांसोबत संयुक्तरीत्या काम करण्याचा मनोदय ब्लूमबर्ग यांनी या वेळी व्यक्त केला.महाराष्ट्र मित्रमंडळात भाषणमहाराष्ट्राने देशातील अग्रेसरत्व पुन्हा सिद्ध केले असून देशाच्या विकासयात्रेचा अग्रदूत म्हणून आपले राज्य सध्या महत्त्वाची भूमिका बजावत आहे. विविध क्षेत्रांतील महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधांच्या प्रकल्पामुळे मुंबई आपली ओळख कायम राखून अत्यंत गतीने परिवर्तन अनुभवत आहे, असे उद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी न्यूयॉर्क येथे काढले. न्यू यॉर्कमधील भारतीय कॉन्सुलेट जनरल आणि महाराष्ट्र मित्र मंडळातर्फे मुंबई मीट्स मॅनहटन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनी या वेळी उपस्थितांशी मराठीत दिलखुलास संवाद साधला. मुंबईसह राज्यात उभारत असलेले पायाभूत सेवा प्रकल्प, जलयुक्त शिवार आदीबाबतची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाMaharashtraमहाराष्ट्र