शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

अंध कर्मचा-याचे ‘डोळस’ काम

By admin | Updated: October 15, 2014 01:20 IST

‘असेल दृष्टी, तर दिसेल सृष्टी’ असे आपण सहजपणे म्हणतो. मात्र ज्यांच्या आयुष्यात जन्मापासून अंधार आहे त्यांनी काय करावे? याचा विचार करताच अंगावर शहारे येतात

ज्ञानेश दुधाडे, अहमदनगर‘असेल दृष्टी, तर दिसेल सृष्टी’ असे आपण सहजपणे म्हणतो. मात्र ज्यांच्या आयुष्यात जन्मापासून अंधार आहे त्यांनी काय करावे? याचा विचार करताच अंगावर शहारे येतात. मात्र, समाजात असे काही अंध आहेत की त्यांचे काम डोळस लोकांनाही लाजवते. महेश भागवत जिल्हा परिषदेच्या सेवेत असून त्याचे काम अन्य कर्मचाऱ्यांना आदर्श ठरावे असे आहे. शिक्षण, खासगी नोकरी असा प्रवास करीत महेश जिल्हा परिषदेच्या सेवेत आला. सुरुवातीला अंध आहे, ही सहानुभूती असणाऱ्या महेशने नंतर आपल्या कामाच्या जोरावर सहकाऱ्यांच्या मनात स्थान निर्माण केले. एमए, पहिल्या प्रयत्नात सेट परीक्षा उत्तीर्ण, हिंदी पदविका परीक्षा, अंध माध्यमिक शिक्षकांची पदव्युत्तर राष्ट्रीय परीक्षा तो उत्तीर्ण आहे. टेलीफोन आॅपरेटरचा कोर्स, मराठी, हिंदी आणि इंग्रजी टायपिंग, संगणकाचे वर्ल्ड, एक्सएल, वेब ब्राऊनिंग, ई-मेल पाठविणे ते डाऊनलोड करण्याची कला त्याला अवगत आहे. त्यासाठी तो अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो. ४ वर्षे देहरे प्राथमिक आरोग्य केंद्र, ८ वर्षे बांधकाम विभागात शिपाई. त्यानंतर पदोन्नतीने हवालदार आणि त्यानंतर शिक्षण विभागात ज्युनिअर क्लार्क म्हणून काम करीत आहे. फोन घेणे, तालुकास्तरावर विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांना सर्व माहिती, निरोप देणे, अहवाल मागवून घेण्याची त्याची जबाबदारी आहे. त्यांच्याशिवाय शिक्षण विभागातून कोणताच निरोप परस्पर तालुकास्तरावर पाठविला जात नाही.