शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

राखी बनविण्याची अंध मुलांची डोळस कामगिरी !

By admin | Updated: August 12, 2016 13:24 IST

नियतीने अंधकारमय जीवन दिलेले असताना मनामध्ये कुठलीही निराशा न ठेवता प्रत्यक्ष स्वताच्या हाताने राख्यांची निर्मिती करुन अंध मुलांनी डोळस कामगिरी करुन दाखविली.

शिखरचंद बागरेचा
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. १२ - नियतीने अंधकारमय जीवन दिलेले असताना मनामध्ये कुठलीही निराशा न ठेवता प्रत्यक्ष स्वताच्या हाताने राख्यांची निर्मिती करुन अंध मुलांनी डोळस कामगिरी करुन दाखविली आहे.
केकतउमरा येथील रहिवाशी चेतन पांडुरंग उचितकर, लक्ष्मी बळीराम वाघ, प्रविण रामकृष्ण कठाळे, कैलास वसंतराव पानबुडे, संदीप केशव भगत, अमोल अर्जुन गोडघासे, तुलशीदास श्रीकांत तिवारी, रुपाली सोपान फुलसावंगी व गौरव गजानन मालक या अंधांनी डोळसांवर मात करीत स्वहस्ते राख्या निर्मितीचा उपक्रम हाती घेतला. संगित कलेच्या माध्यमाने उपजिविका चालविणाºया चेतन सेवांकुर दिव्यांग फाउंडेशनचे दृष्टीहीन अंध सदस्यांनी पावसाळ्यामुळे राख्या बनवून त्यांची विक्री करावी आपली उपजिविका चालवावी यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याची माहिती कैलास पाणबुडे याने दिली. 
या अंध कलाकारांनी स्वनिर्मित राख्या औरंगाबाद तसेच जिल्ह्यातील जउळका रेल्वे येथील एका शाळेला विकून दहा हजार रुपये मिळविण्याची माहिती दिली. एकीकडे रोजगार नाही अथवा शेतात उत्पन्न नाही या कारणावरुन शिक्षित अशिक्षित लोक आत्महत्येचा मार्ग स्विकारत आहेत. तर दुसरीकडे जन्मताच जीवनात अंधार असताना हिम्मत न हारता जिद्द, चिकाटी, परिश्रम व जगण्याची उमेद बाळगून डोळसांना लाजविणारी कामगिरी दहा वर्षीय चिमुकला चेतन उचितकर व त्याचे अंध सहकारी मित्र करीत आहेत. चेतन व त्याचे सहकारी संगितमय आॅस्क्रेस्टा चालवून स्वत:चा उदरनिर्वाह करीत असून चेतन याने आतापर्यंत सुमारे ३५0 कार्यक्रमांद्वारे शेतकरी आत्महत्या , नेत्रदान, व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रूण हत्या, वृक्षारोपण, बेटी बचाव बेटी पढाओ यासारख्या सामाजिक उपक्रमावर तसेच ज्वलंत प्रश्नांवर जनजागरण करुन समाजसेवेचे व्रत जोपासले आहे.