शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
2
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
3
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
4
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
5
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
6
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
7
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
8
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
9
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
10
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
11
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
12
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
13
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
14
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
15
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
16
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
17
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
18
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
19
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
20
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 

दुबईच्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मखर ठाण्याचे

By admin | Updated: August 22, 2016 03:57 IST

गेल्या अनेक वर्षांपासून परदेशातील गणेशभक्तांकडून ठाण्याच्या मखरांना पसंती लाभत आहे.

प्रज्ञा म्हात्रे,

ठाणे- गेल्या अनेक वर्षांपासून परदेशातील गणेशभक्तांकडून ठाण्याच्या मखरांना पसंती लाभत आहे. नायजेरियापाठोपाठ यंदा दुबई येथे साजऱ्या होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवात ठाण्यात तयार झालेल्या सहा फूट उंच मखरात बाप्पा विराजमान होणार आहेत.ठाणेकरांनी पर्यावरणाचे भान राखत यंदाच्या गणेशोत्सवात इकोफ्रेण्डली मखरांना पसंती दिली असताना परदेशातील गणेशभक्तदेखील याच मखरांकडे वळले आहेत. दुबईबरोबरच सिंगापूर, आॅस्ट्रेलियामध्येही ठाण्याचे मखर पोहोचले आहे. आॅस्ट्रेलियातील गणेशभक्ताने घरगुती गणपतीसाठी मोदक मखर तर सिंगापूर येथील गणेशभक्ताने मंदिर मखर नेले आहे. त्याचप्रमाणे चेन्नई येथे वारली कुटी मखर नेण्यात आले आहे. नाशिक, पुणे व कोकणमधून ठाण्यातील इकोफ्रेण्डली मखरांना कायम पसंती लाभली आहे. परदेशातील गणेशभक्त घरगुती गणपतीसाठी एक ते दोन फुटांचे मखर घेऊन जात असल्याची माहिती मखर कलाकार कैलाश देसले यांनी ‘लोकमत’ला दिली. यंदाच्या इकोफ्रेण्डली मखरांमध्ये वारली पेटिंग्जने सजवण्यात आलेल्या मखरांचा प्रभाव दिसून येत आहे. या मखरांना ठाण्यातील गणेशभक्तांनी चांगलीच पसंती दिली आहे. आदिवासी संस्कृती मखराच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला असल्याचे देसले यांनी सांगितले. लाकडापासून बनवलेला दीपस्तंभ गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. इकोफ्रेण्डली मखरांमध्ये एक ते चार फुटांपर्यंतच्या मखरांचा समावेश असून मखर १०१ रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.>गतवर्षी गणेशमूर्तींबरोबर मखरांमध्येही ‘जय मल्हार’चा बोलबाला होता. यंदा गणेशमूर्तींमध्ये जय मल्हारची क्रेझ कमी झाली असली तरी मखरांमध्ये ‘जय मल्हार मखर’ला गणेशभक्तांची पसंती कायम आहे.