ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 12 - पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी भाजपाचे तालुकाध्यक्ष तुषार पाटील शिसोदे तर व्हाईस चेअरमनपदी भास्कर नाना राऊत यांची मंगळवारी निवड झाली. त्यांनी १२ विरुद्ध ९ मतांनी त्यांच्याच पॅनलच्या आप्पासाहेब पाटील व ज्ञानेश औटे यांचा त्यांनी पराभव केला. निवडणूक प्रक्रिया सुरू असताना व निवडणूक झाल्यानंतर उपस्थित शेतकरी व जमावाने माजी आमदार संजय वाघचौरे व कारखाना चालविण्यास घेतलेल्या सचिन घायाळ यांच्या विरोधात रोष व्यक्त करीत घोषणाबाजी केली. निवडणुकीनंतर आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी कारखान्यावर दगडफेक केली.