शहरं
Join us  
Trending Stories
1
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
2
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
3
मुख्यमंत्र नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
4
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया
5
खुनी सोनम रघुवंशीवर लवकरच येणार चित्रपट? बॉलिवूडमधल्या 'या' टॉप अभिनेत्याची बारीक नजर
6
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
7
फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?
8
Virar: 'डिलिव्हरी बॉय'ने लिफ्टमध्येच केली लघवी; आधी दिला म्हणाला नाही, व्हिडीओ दाखवताच...
9
कास्टिंग काऊचची सुरुवात नक्की कशी होते? मराठी अभिनेत्रीने केली इंडस्ट्रीची पोलखोल
10
अखेर 'ते' ब्रिटिश लढाऊ विमान दुरुस्त झाले; केरळहून ब्रिटनच्या दिशेने रवाना
11
आईच्या अपमानाचा बदला! दहा वर्षे घेतला आरोपीचा शोध, समोर येताच केले ठार; सोशल मीडिया पोस्टमुळे सापडले
12
धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या
13
FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट
14
IND vs ENG : इंग्लंडनं खेळली टीम इंडियासारखी 'चाल'; कसोटी क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
15
"मी लघवी स्वत:च प्यायलो, त्यांना दिली नाही म्हणून...", ट्रोल करणाऱ्यांना परेश रावल यांची सणसणीत चपराक
16
'सैय्यारा'से आशिकी हो गयी है मुझे! 'आशिकी गर्ल' श्रद्धा कपूरने सिनेमा पाहून दिली प्रतिक्रिया
17
हुंडा मागतो, दारू पिऊन नवरा मारतो...; हरियाणाच्या डान्सर सपनाचा सासरच्यांवर गंभीर आरोप
18
जगदीप धनखड यांनी ११ दिवसांपूर्वी निवृत्तीवर भाष्य केले; आता अचानक राजीनामा का दिला..?
19
Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला एक दिवा पितरांसाठी ठेवायला विसरू नका, कारण...
20
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागचं कोडं उलगडेना; विरोधी पक्ष हैराण पण भाजपाही संभ्रमात?

भाजपाचा शिवसेनेला नवीन झटका, आयुक्तांकडे स्मार्ट सिटी प्रकल्पाचे अध्यक्षपद

By admin | Updated: June 24, 2016 21:57 IST

मुंबई महापालिकेच्या कारभारावर वचक ठेवण्यासाठी राज्य सरकारने मुख्य लेखापरीक्षक पाठविल्याची घटना ताजी असताना मित्रपक्ष भाजपाने शिवसेनेला आणखी एक झटका दिला आहे़.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २४ - मुंबई महापालिकेच्या कारभारावर वचक ठेवण्यासाठी राज्य सरकारने मुख्य लेखापरीक्षक पाठविल्याची घटना ताजी असताना मित्रपक्ष भाजपाने शिवसेनेला आणखी एक झटका दिला आहे़. स्मार्ट सिटी प्रकल्प स्वबळावर राबविण्याचे आदेश राज्य सरकारने महापालिकेला दिले आहेत़. मात्र या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा प्रमुख महापौरांऐवजी आयुक्तांना बनविण्यात आले आहे़. यामुळे संतप्त शिवसेनेने या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे़.केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पातून मुंबईसह आठ शहरांना वगळण्यात आले आहे़.  मात्र मुंबई आणि नवी मुंबई वगळता अन्य सहा महापालिकांना सिडको आणि मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडून शंभर कोटी रुपये अनुदान मिळणार आहे़. मुंबई आणि नवी मुंबई या महपालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने त्यांना कोणताही निधी देण्यात येणार नाही,असे राज्याच्या नगरविकास खात्याने परिपत्रकातून स्पष्ट केले आहे़.मात्र या प्रकल्पासाठी तयार केलेल्या विशेष मंडळाच्या अध्यक्षपदाची सुत्रे आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत़. या मंडळात महापौर, स्थायी समिती अध्यक्ष़ सभागृह नेता, विरोधी पक्षनेते व स्मार्ट सिटीचे कामकाज पाहणारे अतिरिक्त आयुक्त आणि विविध राजकीय पक्षाचे सदस्य असणार आहेत़. या अभियानाच्या विशेष उद्देश वाहन कंपनीचे नाव ठेवणे व नोंदणीच्या कागदपत्रांवर सह्यांचे अधिकार आयुक्तांनाच देण्यात आले आहेत़. शिवसेनेत नाराजी...मुख्य लेखापरीक्षक पदावर राज्य सरकारने आपला व्यक्ती पाठविल्यामुळे शिवसेनेत तीव्र नाराजी आहे़. त्यात आता स्मार्ट सिटी प्रकल्पात महापौरांना अध्यक्षपद देण्यात न आल्याने शिवसेनेचा तीळपापड झाला आहे़. मात्र या प्रकल्पाला पालिकेतून मंजुरी देणे स्थायी समिती आणि पालिका महासभेचा अधिकार असल्याने जसाच तसे उत्तर देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे़. शिवसेना करणार भाजपाची कोंडी...आयुक्त राज्य सरकारमधूनच नियुक्त करण्यात येत असल्याने या प्रकल्पाचे अध्यक्षपद महापौरांकडे देण्यात यावे़ तसेच प्रकल्पाचा खर्च किती आणि कशा पद्धतीने असेल याची माहिती स्थायी समितीला सादर करण्यात यावी़ अन्यथा या प्रकल्पाला शिवसेना विरोध असेल, असा इशारा सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी दिला आहे़.