शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मतदानापूर्वीच भाजपाचे रवी लांडगे बिनविरोध

By admin | Updated: February 8, 2017 03:22 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी भोसरीतील प्रभाग क्रमांक सहा धावडे वस्तीमधील क जागेवरील भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी भोसरीतील प्रभाग क्रमांक सहा धावडे वस्तीमधील क जागेवरील भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रवी लांडगे यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे भाजपाने महापालिका निवडणुकीत खाते खोलले आहे. रवी लांडगे भाजपाचे माजी शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांचे पुतणे आहेत. प्रभाग क्रमांक ६ मधून उमेदवारासाठी ते इच्छुक होते. चार दिवसांपूर्वी त्यांनी भोसरी विधानसभेतील भाजपाच्या नेतृत्वावर थेट टीका करून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे तक्रार केली होती. अंकुश लांडगेंच्या खुन्याला भाजपातून उमेदवारी दिली जात आहे. ती देऊ नये, अशी मागणी केली होती. त्यामुळे उमेदवारीवरून भोसरीत दोन गट असल्याची चर्चा सुरू होती. रवी लांडगे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर या प्रभागातून राष्ट्रवादी, शिवसेना व मनसेने उमेदवार दिले नव्हते. लांडगेंना सहानुभूती मिळावी, यासाठी अंकुश लांडगे यांच्या जुन्या मित्रांनी पक्षांचे उमेदवार दिले नाहीत. मात्र, आमदार महेश लांडगे व माजी आमदार विलास लांडे यांच्यात श्रेयावरून स्पर्धा लागली आहे. थेरगावातील प्रभागातून राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्याने आमदार लक्ष्मण जगताप समर्थक झामा बारणे यांनी भाजपात प्रवेश केला. याच प्रभागातून भाजपाच्या अधिकृत उमेदवार रेश्मा बारणे यांनी माघार घेतली आहे.(प्रतिनिधी)भोसरीत आमदारांच्या भावासाठी ‘सेटिंग’१पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या गवळीनगर प्रभागातील भाजपाचे अधिकृत उमेदवार व ज्येष्ठ माजी नगरसेवक अमृत पऱ्हाड यांनी आश्चर्यकारकपणे माघार घेतली. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या भावासाठी पऱ्हाड यांचा राजकीय बळी दिल्याची चर्चा भोसरी विधानसभा मतदार संघात आहे. तर चिंचवडमध्ये भाजपाची अधिकृत उमेदवारी मागे घेऊन अपक्ष उमेदवारास पुरस्कृत करण्याची खेळी खेळली जात आहे. २ महापालिका निवडणुकीत भोसरी विधानसभा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात अनेक घडामोडी घडत आहेत. भारतीय जनता पक्षांतील जुन्या नव्यांचा वाद उफाळून आला आहे. शहरातील १२८ पैकी दोन जागांवर भाजपाने अर्ज मागे घेऊन अपक्षांना पुरस्कृत केले आहे. ३गवळीनगर प्रभागातील पऱ्हाड यांनी भाजपाकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे एबी फॉर्म देखील सादर केला होता. मात्र, ऐनवेळी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यांना भाजपाच्या नेत्यांनी अर्ज मागे घेण्याची विनंती केल्याची चर्चा आहे. दरम्यान निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून नव्याने पक्षात आलेल्यांना उमेदवारी देण्यास विरोध केला जात आहे. आमदारांच्या भावासाठी पऱ्हाड यांचा बळी दिला आहे, अशी चर्चा आहे. आमदार बंधू सचिन लांडगे हे भाजप पुरस्कृत उमेदवार झाले आहेत.