शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

"मी राजीनामा मागे घेऊ नये म्हणून भाजपवाल्यांनी देव पाण्यात ठेवले होते", शरद पवारांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 18:51 IST

पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बायो सीएनजी प्रकल्पाचे भूमिपूजन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. 

पंढरपूर : महाराष्ट्रात येत्या दहा तारखेला आपण मुंबईत गेल्यावर तिन्ही पक्षांशी बोलून महाविकास आघाडी म्हणून पुन्हा कामाला सुरुवात करणार आहे. राज्यातील लोकांना बदल पाहिजे आहे. विरोधी पक्षांची एकजूट व्हावी. हीच आमची इच्छा आहे. मी राजीनामा मागे घेऊ नये म्हणून भाजपवाल्यांनी देव पाण्यात ठेवले होते, असा टोला शरद पवारांनी विरोधकांना लगावला. दरम्यान, पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बायो सीएनजी प्रकल्पाचे भूमिपूजन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. 

सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच विठ्ठल कारखान्यावर सीएनजी प्रकल्प उभारला जातो आहे. या निमित्ताने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या शेतकरी मेळाव्यास शरद पवारांनी संबोधित केले. शरद पवार यांच्या निवृत्ती मागे घेण्याच्या निर्णयानंतर या आठवड्यातील शरद पवार यांचा पहिलाच जाहीर कार्यक्रम पंढरपूर येथे झाला. यावेळी आमदार रोहित पवार कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, डॉ. बी.पी. रोंगे , आमदार संदीप क्षीरसागर, खा. ओमराजे निंबाळकर, आ. यशवंत माने, आ. संजयमामा शिंदे , राजन पाटील हे उपस्थित होते.  कर्नाटकात विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस सत्तेतील असे आपल्याला वाटते. एकंदर देशातील राज्याचा विचार केला तर सध्या पाच ते सहा राज्यात केवळ भाजप आहे उर्वरित राज्यांमध्ये भाजप नाही. काँग्रेस फोडून सत्ता आणली गेली आहे. त्यामुळे कर्नाटकात पूर्ण बहुमतात काँग्रेस येईल, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला. तसेच, कर्नाटक सीमावर्ती भागात महाराष्ट्र एकीकरण समितीला इतर पक्षांनी पाठिंबा दिला. मात्र फडणवीस यांनी विरोध केला. त्यामुळे मराठी माणूस बेळगावला अत्याचार सहन करतो आहे, असे शरद पवार म्हणाले.

दरम्यान, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिषेक पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. शरद पवारांच्या हस्ते राष्ट्रवादीचा पंचा घालून त्यांना पक्ष प्रवेश देण्यात आला. माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी पवारांच्या समोरच अभिजीत पाटील यांचे दरेकरांसोबत अर्थात भाजपशी चांगले संबंध आहेत आणि ते पवारांशी सुद्धा संबंध राखून आहेत, अशी टिप्पणी करत त्यांना थेट पक्षात घेण्याची विनंती शरद पवार यांना केली. त्यानंतर शरद पवारांनी अभिजीत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आगामी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा साठी अभिजीत पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार असण्याच्या शक्यतेवर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPandharpurपंढरपूर