शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या मित्रांकडून भाजपाची कोंडी

By admin | Updated: January 21, 2017 03:58 IST

गोंधळाची स्थिती असतानाच भाजपाला रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (रिपाइं) व शिवसंग्राम या दोन मित्रपक्षांनी कोंडीत पकडले आहे

अजित मांडके,

ठाणे- महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती होणार किंवा कसे, याबाबत गोंधळाची स्थिती असतानाच भाजपाला रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (रिपाइं) व शिवसंग्राम या दोन मित्रपक्षांनी कोंडीत पकडले आहे. रिपाइं आठवले गटाने तब्बल २० जागांची, तर शिवसंग्रामने १६ जागांची भाजपाकडे मागणी केली आहे. या मित्रपक्षांच्या ३६ जागांच्या मागणीखेरीज वेगवेगळ्या पक्षांतून भाजपात आलेल्या उपऱ्यांची वर्णी लावल्यावर निष्ठावंतांपुढे किती जागांचा तुकडा भिरकवायचा, असा गंभीर पेच भाजपापुढे निर्माण झाला आहे. भाजपावर जास्तीतजास्त जागांकरिता दबाव वाढवण्याकरिता रिपाइं व शिवसंग्राम या पक्षांना शिवसेनेने फूस लावल्याची दबक्या आवाजातील चर्चा भाजपाच्या वर्तुळातून ऐकायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना, भाजपा, रिपाइं, शिवसंग्राम, रासपा यांचे गळ्यात गळे होते. विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यावर रिपाइंचे रामदास आठवले व शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. आठवले यांची केंद्रातील मंत्रीपदाची आस भाजपाने पूर्ण केली. आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपासोबत आलेल्या मेटे यांना भाजपाने आमदारकी बहाल केली. मात्र, रासपाच्या महादेव जानकर यांना मंत्रीपद देताना मेटे यांना शिवस्मारक समितीच्या प्रमुखपदावर समाधान मानावे लागले. यामुळे ते नाराज असतानाच शिवस्मारकाच्या जलपूजन, भूमिपूजनात डावलल्याने त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत जागावाटपाबाबत चर्चा केली. या पार्श्वभूमीवर ठाण्यात या दोन्ही मित्रपक्षांनी भाजपाकडे तब्बल ३६ जागांची मागणी केली आहे. ठाण्यात शिवसेनेच्या फॉर्म्युलानुसार भाजपाला ते ४५ ते ५० जागा सोडण्याच्या तयारीत असल्याचे समजते. याखेरीज, रिपाइंसाठी पाच जागा सोडण्यास सेना तयार आहे. परंतु, भाजपाला स्वत:लाच ६७ जागा हव्या असल्याची माहिती भाजपाच्या सूत्रांनी दिली. त्यामुळे युती झाली, तर मित्रपक्ष व बाहेरून घेतलेले इच्छुक आणि पक्षाचे निष्ठावंत या साऱ्यांना खूश करणे भाजपाला अशक्य होणार आहे. ‘शिवसंग्राम’चे ठाण्यात फारसे अस्तित्व नाही. परंतु, असे असले तरी मित्रावर दबाव वाढवण्याकरिता त्यांनी १६ जागांची मागणी रेटली आहे. त्यामध्ये प्रभाग क्रमांक १, २, ३, ४, १५, २२ याकरिता आग्रह धरल्याची माहिती ‘शिवसंग्राम’च्या पदाधिकाऱ्यांनी दिली. आम्ही सत्तेतील मित्रपक्ष असल्याने ठाण्यातही त्यांच्या बरोबरीने लढण्यासाठी सज्ज आहोत. आमची ज्या प्रभागांत ताकद आहे, त्या ठिकाणच्या जागा मागितल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. रिपाइं (आठवले ) गटाने भाजपाकडे २० जागांची मागणी केली आहे. मागील निवडणुकीतील जागांपेक्षा यंदा पक्षाने १० जास्त जागांची मागणी केली आहे. शिवसेनेने त्यांना केवळ पाच जागा देण्याची तयारी दाखवल्याने रिपाइंने आपला मोर्चा भाजपाकडे वळवल्याचे बोलले जात आहे. ।आम्ही भाजपाकडे १६ जागांची मागणी केली असून त्यासंदर्भातील पत्र भाजपाकडे देण्यात आले आहे. त्यांच्याकडून आमचा योग्य सन्मान होईल, अशी आशा आहे. - रमेश आंब्रे, शिवसंग्राम संघटना, ठाणे शहराध्यक्ष।मागील निवडणुकीत आम्ही १० जागांवर लढलो होतो. त्यामुळे आता किमान २० जागा आम्हाला मिळाव्यात, ही आमची इच्छा आहे. - रामभाऊ तायडे, ठाणे शहराध्यक्ष रिपांइ, आठवले गट।मित्रपक्षाकडून जागांची मागणी झाली आहे. परंतु, त्यांचा पक्षाकडून योग्य तो सन्मान केला जाईल. - संदीप लेले, अध्यक्ष ठाणे शहर, भाजपा >भाजपातच ६०० जण इच्छुकभाजपाकडून तब्बल ६०० जण इच्छुक आहेत. त्यात मागील काही दिवसांत इतर पक्षांतून आलेल्यांचा समावेश आहे. रिपाइं व शिवसंग्राम यांना भाजपा मोजक्या जागा देणार असला, तरी शिवसेनेने त्यांना फूस लावल्याचे भाजपा नेत्यांचे म्हणणे आहे.भाजपाकडे असलेला एखादा छोटा पक्ष जरी शिवसेनेसोबत गेला, तरी भाजपाला मित्र सांभाळता येत नाही, असा कांगावा करण्याची संधी सेनेला मिळणार आहे.