शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

भाजपचा महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा डाव

By admin | Updated: October 2, 2014 23:50 IST

उद्धव ठाकरे : मोदी लाट साताऱ्यात का दिसली नाही ?

फलटण : ‘महाराष्ट्राचे तुकडे करण्यासाठी व सत्तेच्या स्वार्थापोटी भाजपने युती तोडण्याचे पाप केले आहे. असल्या मतलबी व जनतेला लुबाडणाऱ्या प्रवृत्तींना विधानसभा निवडणुकीद्वारे ठेचून काढीत भगवा फडकवा,’ असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ‘लोकसभा निवडणुकीत मोदी लाट, मोदी लाट म्हणणाऱ्यांना साताऱ्यात का लाट दिसली नाही?,’ असा खोचक सवालही यावेळी त्यांनी भाजपला केला. फलटण-कोरेगाव राखीव विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार डॉ. नंदकुमार तासगावकर यांच्या प्रचारार्थ येथील घडसोली मैदानासमोर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख दिवाकर रावते, डॉ. नंदकुमार तासगावकर, माण-खटावमधील शिवसेनेचे उमेदवार रणजितसिंह देशमुख, वाईचे उमेदवार डी. एम. बावळेकर, कोरेगावचे हणमंतराव चवरे, बारामतीचे राजेंद्र काळे, शिवसेना जिल्हाप्रमुख नंदकुमार घाडगे उपस्थित होते. ‘यापूर्वी आपण युतीमध्ये होतो. आता एकटे आहोत. मात्र, निष्ठावंत शिवसैनिकांच्या जोरावर सर्वांना भारी आहोत, याचा विसर कोणी पडू देऊ नये. भाजपने सत्तेसाठी सेनेचा वापर करून घेतला. त्यांच्या सत्ता स्थापण्यात आमचा सिंहाचा वाटा आहे. आता शिवसेनेला संपवायला केंद्रीय मंत्रिमंडळ राज्यात प्रचाराच्या निमित्ताने आदळणार आहे. याप्रसंगी शिवसैनिकांनी ताकद निवडणुकीद्वारे दाखवून द्यावी, असेही ठाकरे यांनी सांगितले. ‘आजपर्यंत दादा-बाबांच्या टोळीने जनतेला लुबाडले. पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साखरसम्राट आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना संपविण्याचे काम केले आहे. त्यांना काँग्रेसवाल्यांनी साथ देत जनतेला पाणी व विकासापासून वंचित ठेवण्याचे पाप केले आहे. आमचे सरकार १९९५ साली सत्तेत असताना आम्ही झोनबंदी उठविली. आता सत्तेत आल्यावर दोन कारखान्यांमधील अंतर उठविण्याबरोबरच रंगराजन समितीच्या शिफारशीही राबविणार आहोत,’ असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. कारखाना उभारणीत सत्ताधाऱ्यांचा अडथळा यावेळी डॉ. नंदकुमार तासगावकर म्हणाले, ‘पाच वर्षांपूर्वी मी फलटण तालुक्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी साखर कारखाना उभारण्याचा प्रयत्न केला. मात्र, इथल्या सत्ताधारी मंडळींनी त्यामध्ये अडथळे आणले. आर्थिक नुकसान केले. मात्र, तरीसुद्धा आपण येथे कारखाना उभारून प्रत्येकाच्या हाताला काम देणार आहे. मी सच्चा शिवसैनिक आहे. हिंमत असेल तर अडवून दाखवा.’