शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Reservation : 'मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येईल हे शरद पवारांनी जाहीर करावं'; राधाकृष्ण विखे- पाटलांनी स्पष्टच सांगितलं
2
Maratha Reservation : मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली, घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला
3
"जीव धोक्यात घालू नका"! मरीन ड्राईव्हवर शेकडो मराठा आंदोलक समुद्रकिनारी खडकांवर उतरले
4
Maratha Morcha Mumbai: 'मी आयुक्तांना बोलते'; सुप्रिया सुळेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट
5
भाजपच्या माजी आमदार, माजी IPS अधिकाऱ्यासह १४ जणांना जन्मठेप; बिल्डर अन् १२ कोटींचं प्रकरण काय?
6
ओबीसीतून आरक्षण घेणारच, उद्यापासून पाणीही घेणार नाही; मनोज जरांगे पाटील यांची घोषणा
7
तमिळ सुपरस्टार विशालच्या साखरपुड्याचे फोटो पाहिलेत का? १२ वर्षांनी लहान आहे होणारी पत्नी
8
'नरेंद्र मोदींनी चीनला क्लीन चिट दिली', पंतप्रधानांच्या चीन दौऱ्यावरुन काँग्रेस आक्रमक
9
जिओ की वीआय? रोजच्या २.५GB डेटासाठी कोणता प्लॅन स्वस्त? जाणून घ्या दोन्ही कंपन्यांचे फायदे आणि किंमत
10
Gauri Pujan 2025: गौराईला नैवेद्य अर्पण करण्याआधी ताटाखाली काढा पाण्याचे मंडल आणि म्हणा 'हा' मंत्र
11
"मराठा जातीने मागास नाहीत, न्यायालयात अडकवायचं आहे का?"; पाटलांनी सांगितला ओबीसी आरक्षण देण्यातील अडथळा
12
Mumbai: पर्यावरणपूरक मूर्तीच्या नैसर्गिक जलस्रोतात विसर्जनास परवानगी
13
१५ वर्षीय मुलीच्या मागेच लागला साप; १ महिन्यात ६ वेळा चावला, प्रत्येकवेळी पायावर खुणा सोडल्या
14
दिग्गज क्रिकेटपटूच्या लेकीची मैदानात एन्ट्री; चाहत्यांना सौंदर्याने घायाळ करणारी 'ती' कोण?
15
जातीच्या नावाने हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न; मराठा आंदोलनावरून नितेश राणेंचा दावा
16
"आम्ही भेटायला जाणार होतो पण...", प्रियाच्या निधनाबद्दल समजताच उषा नाडकर्णींना अश्रू अनावर
17
Mumbai: धारावीत मैदान, मोकळ्या जागाच नाहीत; खेळायचे कुठे?
18
क्रेडिट कार्ड फक्त पैसेच नाही तर जीवन विमाही मोफत देते; 'या' कार्ड्सवर मिळतो विशेष फायदा
19
हायकोर्टात १० टक्क्यांहून कमी महिला न्यायाधीश, प्रमाण वाढवण्याची मागणी
20
Priya Marathe Passes Away: लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

भारिप-बमसंच्या बालेकिल्ल्यात भाजपची हॅट्ट्रिक!

By admin | Updated: May 16, 2014 20:38 IST

अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे संजय धोत्रे यांनी सलग तिसर्‍यांदा बाजी मारून भारिप-बहुजन महासंघाच्या बालेकिल्ल्यात विजयाची पताका फडकवली आहे.

अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे संजय धोत्रे यांनी सलग तिसर्‍यांदा बाजी मारून भारिप-बहुजन महासंघाच्या बालेकिल्ल्यात विजयाची पताका फडकवली आहे. भाजप, काँग्रेस आणि भारिप-बहुजन महासंघाच्या तिरंगी लढतीत भाजपने गत निवडणुकीपेक्षाही जास्त मताधिक्य घेतल्याने आगामी विधानसभा निवडणुकांवर या निकालाचे परिणाम कसे होतील, हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे.अकोला लोकसभा मतदारसंघातून भारिप-बहुजन महासंघाचे उमेदवार तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर मैदानात होते. सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करून अकोला पॅटर्न सर्वदूर पोहोचवणार्‍या प्रकाश आंबेडकरांना निवडणुकीत काँग्रेसचा पाठिंबा मिळेल, अशी चर्चा निवडणुकीच्या सुरुवातीस होती. त्याअनुषंगाने भारिप-बमसं आणि काँग्रेसमध्ये चर्चाही झाली होती; मात्र त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. काँग्रेसच्या पाठिंब्याची आशा मावळल्यानंतर आंबेडकरांनी यावेळी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली होती. अकोला लोकसभा मतदारसंघातील अकोला पूर्व आणि बाळापूर विधानसभा मतदारसंघ भारिप-बहुजन महासंघाच्या ताब्यात आहेत. याशिवाय जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेवरही भारिप-बमसंचेच वर्चस्व आहे. आपल्या या राजकीय शक्तीच्या बळावर लोकसभा मतदारसंघ काबीज करण्याचा पुरेपूर प्रयत्न आंबेडकरांनी केला. याशिवाय माळी आणि मुस्लीम मतं घेण्यासाठीही त्यांनी व्यूहरचना आखली होती; मात्र काँग्रेसने हिदायत पटेल यांच्या रूपाने सहकार क्षेत्राशी जवळीक असलेला अल्पसंख्याक समाजाचा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्याने मुस्लीम मतदारांवर विसंबून असलेल्या आंबेडकरांचा ताळमेळ बसला नाही.हिदायत पटेल यांच्या उमेदवारीने सामाजिक समीकरणे बदलली. हिदायत पटेल यांच्यामुळे मुस्लीम मतं काँग्रेसच्या बाजूने एकवटल्या गेली. भारिप-बमसंला दलित मतांचे तर काँग्रेसला मुस्लीम मतांचे पाठबळ मिळाले. या तिरंगी लढतीत भाजपचे संजय धोत्रे मोदी लाटेवर स्वार झाले आणि तब्बल दीड लाखांपेक्षाही जास्त मताधिक्याने ते निवडून आले. प्रारंभी निवडणुकीत तुल्यबळ लढत होईल, असा अंदाज होता; मात्र निकालानंतर ही लढत एकतर्फी असल्याचे सिद्ध झाले. काँग्रेसने हिदायत पटेल यांची उमेदवारी उशिरा जाहीर केली. तरीही पटेल यांनी चांगली लढत देऊन, दुसरे स्थान मिळवले. भाजपने अकोला लोकसभा मतदारसंघात केवळ विजयच मिळवला नाही, तर प्रचंड मताधिक्यही मिळवले. या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभावच नव्हता; मात्र भारिप-बहुजन महासंघाचा बालेकिल्ला पुरता ढासळल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.