शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

भाजपाची फिल्डिंग!

By admin | Updated: November 5, 2015 03:33 IST

कल्याण-डोंबिवलीतील महापौरपदासाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार फिल्डिंग लावली असून, शिवसेनेला दूर ठेवत मनसेसह काँग्रेस-राष्ट्रवादी आणि इतरांना सोबत घेऊन महापौरपद मिळविण्याचे

- यदु जोशी,  मुंबईकल्याण-डोंबिवलीतील महापौरपदासाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार फिल्डिंग लावली असून, शिवसेनेला दूर ठेवत मनसेसह काँग्रेस-राष्ट्रवादी आणि इतरांना सोबत घेऊन महापौरपद मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेनेला बाजूला सारून भाजपाचा झेंडा फडकविण्यासाठी सगळेकाही करण्याची आम्हाला मुभा द्या, असे साकडे भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी काल रात्री उशिरा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना घातले. दानवे यांनी त्याला हिरवा झेंडा दाखविला असल्याचे सूत्रांनी सांगितले. कल्याणमध्ये दानवे व स्थानिक नेत्यांची मंगळवारी रात्री २ वाजेपर्यंत गुप्त बैठक झाली. तीत महापौरपदासाठीची रणनीती आखण्यात आली. मनसे कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेबरोबर जाणार नाही आणि शिवसेनेलाही मनसेशी युती करणे राजकीयदृष्ट्या सोईचे नाही. त्यामुळे मनसेचे १० नगरसेवक आपल्यासोबत येऊ शकतात. संघर्ष समितीचे चार नगरसेवक आपल्यासोबत येतील. त्यामुळे ५८ संख्याबळ होते. सत्ता स्थापन करण्यासाठी ६१ नगरसेवकांची गरज आहे. अपक्षांसह इतर तीन नगरसेवक सोबत येतील, असे गणित भाजपाच्या स्थानिक खासदार,आमदारांनी मांडले आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेकडे पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे भाजपाने पुढाकार घेतला तर आपला महापौर होऊ शकतो, असे स्थानिक नेत्यांचे मत आहे.सूत्रांनी सांगितले की, नैसर्गिक युतीचा विचार करून एकदा शिवसेनेशी चर्चा केली जाईल. मात्र, महापौरपदावर कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही. महापौरपद भाजपाला दिले तर चांगलेच आहे. ते राजी होणार नसतील तर संख्याबळाची मोट बांधून महापौरपद खेचून आणा, असे दानवे यांनी बैठकीत सांगितले. दानवे या संदर्भात आज रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत परतल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करतील. शिवसेनेला बाजूला ठेवून कल्याण-डोंबिवलीत महापौरपद मिळविले तर त्याचा राज्य सरकारच्या स्थैर्यावर परिणाम होईल का असा मुद्दा समोर आला आहे. मात्र, एका महापौरपदाच्या वादात शिवसेना राज्यातील सत्ता सोडणार नाही, असे भाजपाला वाटते. सत्तेतून बाहेर न पडण्याची भूमिका शिवसेना आमदारांच्या बैठकीत मंगळवारीच घेण्यात आली. दरम्यान, मनसेच्या दहा नगरसेवकांचा पाठिंबा शिवसेनेने घेतला तर त्याचे विपरित परिणाम मुंबईच्या राजकारणावर होऊ शकतात. मनसेविरोधाची शिवसेनेची धार कमी होईल आणि त्याचा फटका मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर होऊ शकतो. त्यामुळे कल्याणमध्ये सेनेकडून मनसेची मदत घेतली जाणार नाही, असे भाजपा नेतृत्वाला वाटते.लक्ष्मीपूजनाला केली जाणार निवडमहापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ११ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता महापौर निवडला जाणार असून, याच वेळी उपमहापौरपदाची निवडही केली जाणार आहे. त्यासाठी ७ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत. अर्ज दाखल करावयास अवघा तीन दिवसांचा कालावधी उरला असून उमेदवारी दाखल कोण करणार, याबाबत उत्सुकता आहे.काँग्रेस-राष्ट्रवादीशी संपर्क : भाजपाच्या कल्याण-डोंबिवलीतील नेत्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांशी आधीच संपर्क साधला आहे. त्यांचे अनुक्रमे चार आणि दोन नगरसेवक असून ते त्यापैकी बहुतेक आपल्यासोबत येऊ शकतात, असे भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी राज्य नेतृत्वाला सांगितले आहे.घोडाबाजार होऊ शकतोभाजपा आणि शिवसेना या दोघांना कोणत्याही परिस्थितीत महापौरपद हवे असल्याने घोडेबाजाराला ऊत येण्याची शक्यता आहे. विविध आमिषे दाखवून अपक्ष आणि लहान पक्षांच्या नगरसेवकांना गळाला लावले जावू शकते.