शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

आमदार निरंजन डावखरे, संजय केळकर यांच्या नेतृत्वात लोकल प्रवासासाठी भाजपाचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2021 13:45 IST

मुंबई व ठाण्यात निर्बंध कमी झाले, तरी लोकलमध्ये सामान्य प्रवाशांवरील बंदी कायम आहे.

ठाणे - कोरोना निर्बंध शिथिल केले जात असताना, दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासासाठी परवानगी देण्याच्या मागणीसाठी ठाणे शहर भाजपाच्या वतीने निर्बंध झुगारत व उद्धव ठाकरे सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत रेल्वेमधून प्रवास करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोठ्या संख्येने कार्यरत पोलिसांनी भाजपा कार्यकर्त्यांना रोखले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आक्रमक आंदोलनात अनेक पदाधिकारी-कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मुंबई व ठाण्यात निर्बंध कमी झाले, तरी लोकलमध्ये सामान्य प्रवाशांवरील बंदी कायम आहे. ठाणे शहरातून मुंबईत ये-जा करण्यासाठी किमान चार तासांचा अवधी लागतो. जिल्ह्यातील बदलापूर-कसारा, तर वसई-विरार येथून मुंबईत ये-जा करणाऱ्या प्रवाशांचेही हाल होत आहेत. सर्वच चाकरमान्यांना वर्क फ्रॉम होम शक्य नाही. त्यामुळे अनेकांना नोकरीच्या ठिकाणी जावेच लागते. त्यामुळे बहुसंख्य प्रवाशांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. मात्र, या हालांची महाविकास आघाडी सरकारकडून दखल घेतली जात नाही. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी भाजपाकडून मुंबई-ठाण्यात आंदोलने करण्यात आली. त्यानुसार ठाणे रेल्वे स्थानकात झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व आमदार निरंजन डावखरे व आमदार संजय केळकर यांनी केले. या आंदोलनात महापालिकेतील भाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे, प्रदेश सचिव संदिप लेले, ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, सुनेश जोशी, महिला आघाडीच्या अध्यक्षा मृणाल पेंडसे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना रेल्वे प्रवासाला परवानगी द्यायलाच हवी. मात्र, या न्याय्य मागणीकडे महाविकास आघाडी सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे. लाखो प्रवाशांना केवळ राज्य सरकारमुळे दररोज आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागत आहे, अशी टीका आमदार निरंजन डावखरे यांनी केली. दररोज रस्त्याने प्रवासामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. लोकल प्रवासाला परवानगी मिळेपर्यंत भाजपाकडून आंदोलन केले जाईल, असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला.

सोशल मिडियातून प्रवाशांचा पाठिंबाभाजपाच्या आंदोलनातून लाखो सामान्य प्रवाशांची व्यथा उघड झाली. त्याला सोशल मिडियावरही प्रतिसाद मिळाला. भाजपाच्या आंदोलनाला प्रवाशी संघटनांबरोबरच लाखो प्रवाशांनी पाठिंबा दिला. तसेच लोकल प्रवासाला परवानगी देण्याची पुन्हा मागणी केली.`एवढा पोलिस बंदोबस्त लेडिज बारच्या ठिकाणी अपेक्षित' भाजपाकडून शांततामय पद्धतीने आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, भाजपाच्या कार्यकर्त्यांवर दबाव निर्माण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने मोठ्या संख्येने पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. भाजपाचे आंदोलन होऊच नये. त्याचबरोबर कार्यकर्त्यांना रेल्वे प्रवासापासून रोखण्यासाठी पोलिस धडपडत होते. मुंबई-ठाण्यातील सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवरील शांततामय आंदोलने चिरडण्याच्या या वृत्तीचा आमदार व भाजपाचे जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी निषेध केला. तसेच एवढा पोलिस बंदोबस्त लेडिज बारच्या ठिकाणी ठेवण्याची अपेक्षा होती, असा टोलाही आमदार डावखरे यांनी लगावला.

टॅग्स :BJPभाजपाMumbai Localमुंबई लोकलcorona virusकोरोना वायरस बातम्या