शहरं
Join us  
Trending Stories
1
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

आगामी निवडणुकांतही भाजप अव्वल स्थानावरच राहील, मुख्यमंत्र्यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2016 19:00 IST

मागील निवडणुकीत काँग्रेसने प्रशासनाचा गैरवापर करून सत्ता मिळवली. परंतु यावेळी सरकार भाजपचे आहे. त्यांच्याप्रमाणे आम्ही प्रशासन यंत्रणेचा गैरवापर न करता

ऑनलाइन लोकमत शिर्डी, दि. 23 - नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या मागील निवडणुकीत काँग्रेसने प्रशासनाचा गैरवापर करून सत्ता मिळवली. परंतु यावेळी सरकार भाजपचे आहे. त्यांच्याप्रमाणे आम्ही प्रशासन यंत्रणेचा गैरवापर न करता कार्यकर्त्यांच्या ताकतीवर आमचा बालेकिल्ला परत खेचून आणू, असा विश्वास व्यक्त करतानाच राज्यात भाजपा क्रमांक एकचा पक्ष आहे व आगामी नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकांतही आम्ही क्रमांक एकवरच राहू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.उत्तर महाराष्ट्रातील भाजपा पदाधिका-यांच्या शिर्डी येथील बैठ्ठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे होते. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, पाटबंधारे मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे, विजयकुमार रावल, जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर उत्तर महाराष्ट्रातील भाजपाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, राज्यात पंधरा वर्षांपासूनची सत्ता उलथवून टाकत भाजपा सत्तेवर आला. गेल्या दोन वर्षात राज्यातील पाच हजारांहून अधिक ग्रामपंचायतींवर भाजपाची सत्ता आली आहे. विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भाजपाचे चिन्ह सर्वदूर पोहोचले. भाजपाच्या ताकतीवर राज्यात परिवर्तन घडणार आहे. नगरपालिका व महानगरपालिकांमध्येही राज्यात मोठे परिवर्तन घडणार असून भाजप हा क्रमांक एकचा पक्ष असेल. भाजपासोबत जे येतील त्यांना बरोबर घेवू. अन्यथा स्वबळावर लढून अव्वल स्थान मिळवू असेही ते म्हणाले. राज्यातील जनतेने पंधरा वर्षांतील भ्रष्ट कारभार बघितला आहे. आता आमचा अडीच वर्षांचा पारदर्शक कारभार जनतेपुढे आहे. एकत्रित बसून नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे. नगरपालिका निवडणुका जिंकण्याची खूणगाठ प्रत्येक लोकप्रतिनिधीने बांधावी. नाशिक पदवीधर मतदार संघ भाजपासाठी अतिशय प्रतिष्ठेचा आहे. विधानसभेत बहुमत असले तरी विधानपरिषदेत बहुमत नाही. त्यामुळे चांगले निर्णय घेण्यास विलंब लागतो. त्यासाठी नाशिक पदवधीर मतदार संघात भाजपाचाच उमेदवार निवडणून आला पाहिजे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचेही भाषण झाले. साई संस्थानचे विश्वस्त सचिन तांबे यांनी आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)---------स्थानिक निवडणुकीसाठी आघाडीचानिर्णय जिल्हा पातळीवरस्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका भाजप पक्षाच्या चिन्हावरच लढणार आहे. मित्रपक्षांबरोबर आघाडी करायची की नाही यासंबंधीचा निर्णय जिल्हापातळीवर घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. परंतु मित्रपक्षाव्यतिरिक्त आघाडी करण्याबाबत प्रदेशाची परवानगी घ्यावी लागणार असल्याचेही दानवे यांनी स्पष्ट केले.