शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर महाराष्ट्रात भाजपला बंडखोरीची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 06:55 IST

अनिल गोटे, वाकचौरे, कोकाटे, नटावदकरांची बंडखोरी

अहमदनगर/जळगाव/ नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील चार मतदारसंघांत भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांविरुद्ध बंडखोरांनी शड्डू ठोकला आहे. धुळ्यात भाजप आ. अनिल गोटे यांनी तर नंदुरबारमध्ये डॉ. सुहास नटावदकर यांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवले आहेत. 

शिर्डीत भाजपचे भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्याविरोधात बंडखोरी केली आहे. शिवसेना, काँग्रेस असा प्रवास करून भाजपत आलेले वाकचौरे अपक्ष उमेदवार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस), सदाशिव लोखंडे (शिवसेना) व वाकचौरे (अपक्ष) असा सामना होत आहे.

नंदुरबारमध्ये भाजपचे डॉ. सुहास नटावदकर यांनी त्यांच्याच पक्षाच्या खा. हीना गावित यांच्या विरोधात बंडखोरी केली आहे. ते म्हणाले, भाजपतील तळागाळातील व जनसंघापासून असलेल्या कार्यकर्त्यांचा आवाज माझ्यासाठी महत्त्वाचा आहे.

धुळ्यात भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. गोटेंच्या उमेदवारीमुळे केंद्रीय मंत्री डॉ.सुभाष भामरे यांची अडचण झाली आहे. नाशिकमध्ये भाजपचे अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांची बंडखोरी आहे. शिवसेनेचे खा. हेमंत गोडसे रिंगणात येथे असून, त्यांना बंडखोरीचा फटका त्यांना बसू शकतो. कोकाटेंवर अपसंपदेचा आरोप असून त्याची चौकशी सुरू आहे. यावर कोकाटे म्हणतात की, सरकार नोटीस देऊन ब्लॅकमेलिंग करीत असल्यानेच निवडणूक लढविणार आहे.

कोण आहेत हे बंडखोर उमेदवार?अ‍ॅड. कोकाटे यांनी सिन्नर मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून काम केले आहे. त्यात दोन वेळा कॉँग्रेस, तर एकदा सेनेकडून त्यांनी उमेदवारी केली होती. भाऊसाहेब वाकचौरे हे शिर्डीच्या साई संस्थानचे माजी कार्यकारी अधिकारी असून २००९ मध्ये ते शिवसेनेतर्फे विजयी झाले. पण २०१४ ची निवडणूक काँग्रेसकडून लढवून पराभूत झाले. त्यानंतर त्यांनी भाजपत प्रवेश करून श्रीरामपूरमधून विधानसभा लढविली, पण तिथेही पराभूत झाले.

टॅग्स :BJPभाजपाAnil Goteअनिल गोटे