शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Sharad Pawar: सरकार पडेना म्हणून भाजप अस्वस्थ; शरद पवार यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 07:03 IST

Sharad Pawar: केंद्रीय यंत्रणांच्या मदतीशिवाय ‘ते’ रेकॉर्डिंग मिळविणे अशक्य

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्राची सत्ता भाजपच्या हातातून गेल्यानंतर विविध केंद्रीय यंत्रणांची मदत घेऊन सरकार अस्थिर करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना यश मिळत नसल्यामुळे अशा प्रकारची टोकाची भूमिका घेतली असावी, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पेनड्राईव्ह बॉम्बवर लगावला आहे.

फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत टाकलेल्या पेनड्राईव्ह बॉम्बबाबत  पवार म्हणाले की, १२५ तासांची रेकॉर्डिंग मिळवणे ही कौतुकास्पद बाब आहे. शक्तिशाली  केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीशिवाय हे शक्य नाही. मात्र, त्या रेकॉर्डिंगची सत्यता आधी तपासली गेली पाहिजे. त्याची चौकशी राज्य सरकार नक्की करेल. त्या रेकॉर्डिंगमध्ये प्रत्यक्ष - अप्रत्यक्षरित्या माझेही नाव घेतले गेल्याचे दिसते. मात्र, माझे यासंदर्भात कुणाशी बोलण्याचे काही कारण नाही. एखादी व्यक्ती सार्वजनिक जीवनामध्ये प्रतिनिधित्व करत असते, त्यावेळेस त्याच्यावरच्या तक्रारींची शहानिशा केल्याशिवाय भाष्य करणे योग्य नाही. विनाकारण तक्रार करून लोकप्रतिनिधींवर वेगवेगळ्या केंद्रीय यंत्रणांची मदत घेऊन त्यांना नाउमेद करण्याचा प्रयत्न सध्या होत आहे.  

देशमुखांच्या घरावरील ९० छापे सत्तेचा गैरवापर सत्तेचा गैरवापर करून तपास यंत्रणांद्वारे चौकशी करण्याचे सर्वात मोठे उदाहरण हे अनिल देशमुख यांचे आहे. एकाच व्यक्तीच्या घरावर ९० छापे टाकण्याचा प्रकार मी तरी पहिल्यांदा पाहिला, असे ते म्हणाले.

राजीनामा नाहीमलिकांनी राजीनामा द्यायचा संबंधच नाही. मुस्लिम नेता असला की त्याचा संबंध थेट दाऊदशी जोडला जावा, हे फार निरर्थक आहे. खा. संजय राऊत यांनीही केंद्रीय तपास यंत्रणांचा होत असलेल्या गैरवापराचा विषय पंतप्रधानांपर्यंत पोहोचवलेला आहे. पंतप्रधानही खोलात चौकशी करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

आराेपांबाबत ‘दूध का दूध होईल’; वळसे पाटील यांचा टोलाn देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे बुधवारी विधानसभेत उत्तर देणार होते. ‘माझ्याकडे सगळे उत्तर तयार आहे. पण, आज विरोधी पक्षनेते फडणवीस यांना बाहेर जायचे असल्याने उत्तर उद्या द्यावे, अशी विनंती त्यांनी मला केली होती. 

n मी उद्या गुरुवारी उत्तर देईन, असे वळसे पाटील यांनी सांगितले. ‘फडणवीस यांच्या आरोपांवर ‘दूध का दूध, पानी का पानी होऊनच जाईल’, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस