शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर: स्थायी समिती सभापती पदासाठी भाजप, शिवसेनेकडून अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 19:22 IST

महापालिका स्थायी व प्रभाग समिती सभापती पदासाठी बुधवारी निवडणूक होणार असून स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपकडून दीपक सिरवानी तर शिवसेनेकडून कलवंतसिंग सोहतो यांनी अर्ज दाखल केले.

सदानंद नाईक

उल्हासनगर : महापालिका स्थायी व प्रभाग समिती सभापती पदासाठी बुधवारी निवडणूक होणार असून स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपकडून दीपक सिरवानी तर शिवसेनेकडून कलवंतसिंग सोहतो यांनी अर्ज दाखल केले. स्थायी समिती मध्ये भाजपचे बहुमत असल्याने, सिरवानी यांची निवड निश्चित असल्याचे बोलले जात असून त्यांचे समिती सदस्य अज्ञातस्थळी आहेत. 

उल्हासनगर महापालिका स्थायी व प्रभाग समिती सभापती पदे आपल्याकडे राखण्यासाठी शिवसेना-ओमी कलानी टीम व भाजप-रिपाइं आघाडी आमनेसामने उभी ठाकली स्थायी व प्रभाग समिती सभापती पदाची निवडणूक बुधवारी १६ जून रोजी होणार आहे. स्थायी समिती मध्ये भाजप-रिपाइंचे बहुमत असले तरी, गेल्या वर्षी प्रमाणे शिवसेना काय राजकीय खेळी खेळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले. यातूनच स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणूक काही दगाफटका होऊ नये, म्हणून भाजपने पक्षाचे समिती सदस्य अज्ञातस्थळी नेले. स्थायी समिती मध्ये भाजपचे-८, रिपाइं-१, शिवसेना-५, राष्ट्रवादी-१ व साई पक्षाचा-१ असे एकून १६ सदस्य असून १६ पैकी भाजप-रिपाइंचे ९ सदस्य आहेत. स्थायी समिती सभापती पदासाठी भाजप-रिपाइं आघाडीकडून टोनी सिरवानी व शिवसेना आघाडीकडून कलवंत सोहतो यांनी महापालिका सचिव व उपायुक्त अशोक नाईकवाडे यांच्याकडे आज अर्ज दाखल केले. 

महापालिका प्रभाग समिती क्रं-१ च्या सभापती पदासाठी भाजप कडून मीना कौर लबाना तर शिवसेनेकडून अंजना म्हस्के व हरेश जग्याशी यांनी अर्ज दाखल केले. प्रभाग समिती क्रं-२ च्या सभापती पदासाठी भाजप कडून महेश सुखरामनी तर भाजप-ओमी टीम कडून छाया चक्रवर्ती, प्रभाग समिती क्रं-३ च्या सभापती पदासाठी भाजपकडून रवी जग्याशी तर शिवसेना-ओमी टीम कडून दीप्ती दुधानी तर प्रभाग समिती क्रं-४ च्या सभापती पदी भाजप कडून सुमन सचदेव व शिवसेनेकडून विकास पाटील यांनी अर्ज दाखल केले. भाजपातील ओमी कलानी टीम समर्थक नगरसेवक शिवसेने सोबत असून राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेविका सुमन सचदेव यांनी भाजप कडून अर्ज दाखल केला. तर साई पक्षाचे बहुतांश नगरसेवकांनी गेल्या महापौर पदाच्या निवडणुकी पूर्वी भाजप मध्ये प्रवेश केला. त्यातील बहुतांश नगरसेवक एकत्र येऊन प्रभाग समिती क्रं-३ च्या सभापती पदासाठी उमेदवार उभा केला.  शिवसेना-ओमी टीमच्या आघाडीचे संकेत

महापालिका महापौर पदाच्या निवडणुकी नंतर शिवसेने सोबत भाजपातील ओमी कलानी टीम समर्थक नगरसेवक गेले होते. स्थायी व प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणुकीत त्यांची युती कायम असून स्थायी सभापती पद निवडणुकीत काही करिष्मा दाखवितात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

टॅग्स :Politicsराजकारणkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाShiv SenaशिवसेनाBJPभाजपा