शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषद निवडणुकीत भाजपा-शिवसेनेची युती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 05:25 IST

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी राज्यात सत्तारुढ भाजपा-शिवसेनेत युती झाली

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी राज्यात सत्तारुढ भाजपा-शिवसेनेत युती झाली. दोन्ही पक्ष प्रत्येकी तीन जागा लढवतील. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा घोळ मात्र कायम आहे.अमरावतीत प्रवीण पोटे हे भाजपाचे उमेदवार असतील. चंद्रपूर-वर्धेतून पक्षसंघटनेत दीर्घकाळ काम करीत असलेले रामदास आंबटकर यांना भाजपाने संधी दिली आहे. लातूर-बीड-उस्मानाबादच्या उमेदवारीचा निर्णय झाला नसला तरी माजी राज्यमंत्री सुरेश धस यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.शिवसेनेने नाशिकमध्ये नरेंद्र दराडे यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने उमेदवारी नाकारलेले शिवाजी सहाणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. दराडेंनी ऐनवेळी शिवसेनेत येऊन उमेदवारी मिळविली. परभणी-हिंगोलीमध्ये शिवसेनेने अकोल्यातील पक्षाचे विधान परिषद सदस्य गोपीकिशन बाजोरिया यांचे पुत्र विप्लव यांना आधीच उमेदवारी दिली आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये अ‍ॅड. राजीव साबळे यांना मैदानात उतरविले आहे.लातूर-बीड-उस्मानाबादमध्ये भाजपा-शिवसेनेपेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादीकडे तब्बल ९४ मते अधिक आहेत, पण कागदावरील गणित बिघडविण्यासाठी भाजपा प्रतिष्ठा पणाला लावेल, असे दिसते. भाजपाकडून दावेदार असणाऱ्या रमेश कराड यांना राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी पक्षप्रवेश देत निवडणूक रिंगणात उतरविले. शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारीचा निर्णय न झाल्यामुळे कराड यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली.परभणी-हिंगोलीत युतीकडे १५० तर आघाडीकडे तब्बल २९० मते आहेत. मात्र, अकोल्यात शिवसेनेकडे जास्त मते नसूनही विधान परिषदेची निवडणूक जिंकून दाखविणारे गोपीकिशन बाजोरिया आपल्या मुलासाठी सर्व प्रकारच्या शक्कली लढवतील. बुधवारी काँग्रेसकडून माजी आ़ सुरेश देशमुख यांनी तर शिवसेनेकडून विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले़ सुशीलकुमार देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला़आघाडीचा निर्णय नाहीकाँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र आघाडीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते दिल्लीत या बाबत निर्णय घेऊन कळवतील, असे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.चंद्रपूर-वर्धा, अमरावती आणि लातूर-बीड-उस्मानाबाद या तीन जागा भाजपा लढविणार असून नाशिक, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग व परभणी-हिंगोली या तीन जागा शिवसेना लढवेल.संख्याबळाचा विचार केला तर चंद्रपूर-वर्धा, अमरावती दोन जागांवरील भाजपाचा विजय निश्चित मानला जातो. नाशिकमध्ये युती घट्ट राहिली तर शिवसेनेचा विजय पक्का असेल. कालपर्यंत शिवसेनेत असलेले शिवाजी सहाणे यांना राष्ट्रवादीने दिलेली उमेदवारी शिवसेनेसाठी धोक्याची ठरू शकते.