शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्षनेतेपदासाठी भाजपची धावपळ सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 06:55 IST

विनोद मिश्रा यांच्याऐवजी आता प्रभाकर शिंदे यांचे नाव गटनेते पदासाठी निश्चित करण्यात आले आहे.

मुंबई : गटनेता जाहीर होण्याआधी विरोधी पक्षनेतेपदाच्या तयारीला लागलेल्या भाजपला कोंडीत पकडण्याचे मनसुबेशिवसेना आणि काँग्रेसने आखले होते. मात्र आपली चूक लक्षात येताच आठवडाभरात गटनेता बदलण्याची वेळ पहारेकऱ्यांवर आली आहे. विनोद मिश्रा यांच्याऐवजी आता प्रभाकर शिंदे यांचे नाव गटनेते पदासाठी निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे गुरुवारच्या महासभेत विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याचा भाजपचा मार्ग मोकळा झाला आहे.२०१७च्या पालिका निवडणुकीत ८३ संख्याबळ मिळवून भाजप दुसरा मोठा पक्ष ठरला. सत्तेच्या रस्सीखेचात शिवसेनेने बाजी मारल्यानंतर भाजपने पहारेकऱ्यांची भूमिका स्वीकारली. मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सत्ताधारी आणि महापालिकेतील विरोधी पक्षाने भाजपची कोंडी करण्यास सुरुवात केली. २०२२ मध्ये भाजप पूर्णशक्तीनिशी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी करत आहे. त्यामुळे या काळात आक्रमकता कायम ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेतेपदावर भाजपने दावा केला आहे. त्यानुसार भाजपचे नवीन गटनेते म्हणून नगरसेवक विनोद मिश्रा यांची निवडकरण्यात आली. मात्र याप्रकरणी महासभेत घोषणा करण्याबाबत महापौरांना सूचित न करता विरोधी पक्षनेतेपदासाठी प्रभाकर शिंदे यांचे नाव जाहीर करण्याबाबत भाजपने महापौरांना पत्र पाठवले. निर्माण झालेल्या या तांत्रिक अडचणीवर बोट ठेवून भाजपला मात देण्याचे मनसुबे शिवसेना आणि काँग्रेसने आखले होते. मात्र ते अचूक हेरत या दोन्ही पक्षांना शह देण्यासाठी भाजपने मंगळवारी तडकाफडकी प्रभाकर शिंदे यांना पक्षाचे गटनेते म्हणून जाहीर करण्याचीविनंती केली आहे.विशेष म्हणजे, यासंदर्भातील पत्र भाजपकडून २७ फेब्रुवारी या जुन्या तारखेने पाठविण्यात आले आहे. यामुळे शिवसेना आता काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले>निकाल गुरुवारीभाजप दुसरा मोठा पक्ष असल्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावर त्यांचा दावा योग्य ठरतो. मात्र विरोधी पक्षनेतेपद सध्या काँग्रेसकडे आहे. त्यामुळे येत्या गुरुवारच्या मुंबई महापालिकेच्या महासभेत शिवसेना यासंदर्भात नेमकी कोणतीभूमिका घेणार? याविषयी पालिका वर्तुळात उत्सुकता आहे.>काँग्रेसचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यातकाँग्रेस पक्षाकडे २८ एवढे कमी संख्याबळ आहे. तरीही भाजपने हक्क सोडल्यामुळे काँग्रेसला मुंबई महापालिकेतील मोठ्या पदांपैकी एक असलेले विरोधी पक्षनेतेपद मिळवता आले. गेली दोन वर्षे काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक रवि राजा या पदावर विराजमान आहेत. मात्र भाजपच्या दाव्यामुळे हे महत्त्वाचे पद हातून निसटण्याची धास्ती काँग्रेसला लागली आहे.