शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Tauktae Cyclone: मच्छीमारांचे प्रश्न सरकारने सोडविले नाही, तर पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही: दरेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 18:36 IST

Tauktae Cyclone: आमदार रमेश पाटील यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते  प्रवीण दरेकर व माजी मंत्री विजय गिरकर यांच्यासोबत मढ कोळीवाडा येथील नुकसानीची पाहणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: तोक्ते चक्रीवादळामुळे मालाड पश्चिम मढ कोळीवाड्यातील  बोटींचे मोठे नुकसान झाले आहे. येथील आपदग्रस्त मच्छिमारांना कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजपाचे विधान परिषद आमदार रमेश पाटील यांनी आर्थिक मदतीचा धनादेश व धान्यवाटप करून दिलासा दिला.

दि. २८ मे रोजी आमदार रमेश पाटील यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते  प्रवीण दरेकर व माजी मंत्री विजय गिरकर यांच्यासोबत मढ कोळीवाडा येथील नुकसानीची पाहणी केली. यावेळी तेथील मच्छिमार बांधवांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या होत्या. हरबादेवी मंदिराच्या या पटांगणात काल सायंकाळी झालेल्या वाटप कार्यक्रमात आमदार रमेश पाटील यांच्यावतीने विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर व माजी मंत्री माननीय विजय गिरकर यांच्या हस्ते बोट मालकांना धनादेश व अन्न धान्य वाटप करण्यात आले.

सरकारने मच्छिमार बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना मच्छिमारांना अपुरी मदत करून मच्छिमारांना निराश करून सरकारने मच्छीमारांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. ४० ते ५० लाख रुपये किमतीच्या बोट मालकांना २० ते २५ हजारांची मदत करून कोळी समाजाची सरकारने चेष्टा केली आहे, असा आरोप आमदार रमेश पाटील यांनी केला.

मच्छिमार बांधवांना आर्थिक मदत करण्याचे ठरविले, त्याप्रमाणे मढ कोळीवाडा येथील नुकसान झालेल्या सर्व बोट धारकांना आर्थिक सहाय्य करून मच्छीमार बांधवांना धान्य वाटप केले अशी माहिती त्यांनी दिली. 

यावेळी  विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, ज्या बोट मालकाच्या बोटीचे नुकसान झालेले आहे अशा बोट मालकांना मुंबई जिल्हा बँकेकडून बिनव्याजी कर्ज, किसान क्रेडिट कार्ड देण्यात येईल व मत्स्यव्यवसायाला शेतीचा दर्जा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे त्यांनी मच्छीमार बांधवांना सांगितले. तसेच मच्छीमारांचा डिझेल परतावा सरकारने ठराविक दिवसात मच्छिमारांना देण्याबाबत कायदा बनविण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दरेकर यांनी दिले. मच्छीमार बांधवांना सरकारने मदत केली नाही किंवा मच्छिमारांचे प्रश्न सरकारने सोडविले नाही तर पावसाळी अधिवेशन चालू देणार नसल्याचा सरकारला इशारा त्यांनी दिला.  राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री या विभागाचे प्रतिनिधी असताना त्यांनी मच्छीमारांना योग्य मदत जाहीर करणे गरजेचे होते. परंतु, त्यांनी कोणतीही मदत जाहीर केली नसल्याचे सांगून मी मंत्री असतो तर प्रत्येक मच्छीमाराला एक लाख रुपये मदत जाहीर केली असती, असे प्रवीण दरेकर म्हणाले.

विजय गिरकर यांनी मच्छिमारांना सरकारने तुटपुंजी मदत न करता योग्य मदत केली पाहिजे व ही मदत मिळविण्यासाठी आम्ही सभागृहात सरकारला धारेवर धरू, असे सांगून आमदार रमेश पाटील यांनी मच्छिमारांना जी मदत केली याबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके, मच्छिमार नेते किरण कोळी, राजेश्री भानजी, महाराष्ट्र भाजपा मच्छिमार सेलचे अध्यक्ष अँड.चेतन पाटील तसेच भाजपा व कोळी महासंघाचे इतर पदाधिकारी व मढ ग्रामस्थ व कोळी महिला उपस्थित होते.

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळMumbaiमुंबई