शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-राष्ट्रवादीचा घटस्फोट!

By admin | Updated: July 20, 2014 01:11 IST

अगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी २८ महिन्यांपूर्वी एकत्र आलेल्या भाजप-शिवसेनेपासून राष्ट्रवादी काँग्रेस घटस्फोट घेणार आहे. २० सप्टेंबरला होणाऱ्या अध्यक्ष

जिल्हा परिषद : अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी गणेश हूड - नागपूरअगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी २८ महिन्यांपूर्वी एकत्र आलेल्या भाजप-शिवसेनेपासून राष्ट्रवादी काँग्रेस घटस्फोट घेणार आहे. २० सप्टेंबरला होणाऱ्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व भाजप-शिवसेना युतीत लढत होणार आहे. यासाठी दोन्हीकडून मोर्चेबांधणी सुरू असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. जि.प.तील भाजप-शिवसेनेसोबत असलेली आघाडी संपुष्टात आणा, असे पत्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा कमिटीला पाठविले आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे स्पष्ट आहे. अध्यक्ष, उपाध्यक्षांचा कार्यकाळ २० सप्टेंबरला, विषय समित्यांच्या सभापतींचा २ आॅक्टोबरला तर पंचायत समिती सभापतींची मदत १४ सप्टेंबरला संपत आहे. अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे.केंद्रात भाजपची सत्ता आहे. विधानसभा निवडणुकीतही युतीचीच सत्ता येईल, अशी हवा आहे. अशा परिस्थितीत जि.प.तील सत्ता टिकविण्यासाठी भाजप नेत्यांनी मोर्चेबांधणी केली आहे. सदस्यांची पळवापळवी होऊ नये, यासाठी भाजप-शिवसेना व गोंडवाना गणतंत्र पक्षाच्या आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदणी केली आहे. परंतु हा पक्षांतर बंदीचा कायदा राष्ट्रीय पक्षांनाच लागू होत असल्याने, याचा गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या सदस्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असे जाणकाराचे मत आहे. तसेच अध्यक्षपद मिळाले नाही तर भाजप-शिवसेनेत बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे निवडणुकीत चमत्कार होणार असल्याची चर्चा आहे. जि.प.तील ५९ सदस्यांत बसपा, गोगपा व आरपीआय पक्षांचा प्रत्येकी एक सदस्य आहे. या सदस्यांच्या भूमिकेवर सत्ता समीकरण अवलंबून आहे. सध्या सत्ताधारी आघाडीकडे भाजप २२, शिवसेना ८, राष्ट्रवादी ७ व गोगपा १ असे ३८ चे संख्याबळ आहे. राष्ट्रवादी आघाडीतून बाहेर पडल्यानंतर ही संख्या ३१ होणार आहे. परंतु अध्यक्षपदाचे दावेदार अनेक असल्याने बंडखोरांची संख्याही मोठी आहे. गेल्या निवडणुकीत अध्यक्षपदावरून भाजपमध्ये वाद निर्माण झाला होता. भाजपच्या निशा सावरकर व शिवसेनेच्या भारती गोडबोले यांनी बंडाची भूमिका घेतली होती. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच गाजली होती. भाजपकडून अध्यक्षपदासाठी अरुणा रमेश मानकर व निशा टेकचंद सावरकर व शुभांगी गायधने यांच्या नावांची चर्चा आहे. काँग्रेसचा उमेदवार वेळेवर होणाऱ्या समीकरणानुसार ठरणार असल्याचे समजते.