शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

भाजपा आमदाराचे प्राचार्यपद बनावट

By admin | Updated: June 3, 2015 01:46 IST

भाजपाचे वर्धा विधानसभा मतदार संघातील आमदार डॉ. पंकज भोयर यांनी विद्यापीठात बनावट कागदपत्रे सादर करुन महिला विकास संस्था संचालित पुलगाव येथील कला

वर्धा : भाजपाचे वर्धा विधानसभा मतदार संघातील आमदार डॉ. पंकज भोयर यांनी विद्यापीठात बनावट कागदपत्रे सादर करुन महिला विकास संस्था संचालित पुलगाव येथील कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्यपद मिळवले. असा आरोप युवक काँग्रेस कमिटीचे माजी महासचिव महेश तेलरांधे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. माहितीच्या अधिकारात रातुम नागपूर विद्यापीठाकडून प्राप्त दस्तावेज त्यांनी यावेळी सादर केले. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी विद्यापीठाच्या कुलगुरु व कुलसचिवाकडे केली आहे. शिष्यवृत्ती घोटाळ्यातील कथित सहाभागापाठोपाठ सदर प्रकरणानेही आ. भोयर यांच्या अडचणीत भरच घातली आहे. डॉ. पंकज भोयर यांच्या अधिव्याख्याता पदाकरिता विद्यापीठाद्वारे गठित निवड समितीची बैठक ५ नोव्हेंबर २००० रोजी झाल्याचे कागदपत्रांवरुन समजते. डॉ. भोयर यांनी एम.ए. (अर्थशास्त्र) ची परीक्षाच ६ आॅक्टोबर २००० रोजी उत्तीर्ण केलेली आहे. शैक्षणिक अहर्ता प्राप्त होण्याच्या तीन महिन्याआधीच म्हणजे १ जुलै २००० रोजी त्यांची अधिव्याख्याता म्हणून रुजू झाल्याची बाब तेलरांधे यांनी तक्रारीत नमूद केली आहे. अनुदानित महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाच्या निवडीसाठी शासन प्रतिनिधी म्हणून सहसंचालक, उच्च शिक्षण, नागपूर यांची उपस्थिती असणे आवश्यक होती. मात्र त्यांच्या अनुपस्थितीत त्यांची निवड झाल्याचे दिसून येते, याकडेही तेलरांधे यांनी लक्ष वेधले आहे. डॉ. पंकज भोयर यांनी विद्यापीठ व शासनाची दिशाभूल करुन वेतन स्वरुपात शासनाचे पैसे लाटले असून याबाबत योग्य कार्यवाहीची मागणीही विद्यापीठाकडे करण्यात आल्याची माहितीही तेलरांधे यांनी दिली. (जिल्हा प्रतिनिधी)