शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

"आधी योग्य माहिती घ्या मगच बोला"; जरांगे पाटील अन् प्रसाद लाड यांच्यात जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 10:38 IST

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी शिवीगाळ केल्यानंतर प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

BJP MLC Prasad Lad on Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने रोष व्यक्त करत आहेत. अशातच मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. त्यावरुन देवेंद्र फडणवीस यांचा बचाव करण्यासाठी आलेल्या भाजप आमदार प्रसाद लाड यांना मनोज जरांगे पाटील यांनी शिवीगाळ केली. या सगळ्या प्रकरणावरुन आता प्रसाद लाड यांनी भाष्य केले आहे.

भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर टीका करताना मनोज जरांगे पाटील यांची जीभ घसरली. मराठा समाजाला सरसकट आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे सातत्याने सरकारला धारेवर धरत आहेत. याचसाठी जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात करणार आहेत. गुरुवारी माध्यमांशी बोलताना जरांगे यांनी प्रसाद लाड यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संताप व्यक्त केला. मनोज जरांगे यांना डीडी नावाचा रोग झालाय. डीडी म्हणजे देवेंद्र द्वेषी, असे लाड यांनी म्हटलं होतं. त्यावर बोलताना मनोज जरांगे यांनी कॅमेरासमोर प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली.

"तू किती पैसेवाला आहेस आणि तू किती भ्रष्टाचारी आहेस. मनोज जरांगेच्या नादी लागू नको. मनोज जरांगे जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तुझं घर मोठं करणारी औलाद आहे तू. माझ्या नादी लागू नको. मी तुझं केव्हा नाव घेतलं का?  आमच्यामध्ये ढवळाढवळ करू नको. कारण आमच्या लेकरांचं वाटोळं झालंय," अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती.

प्रसाद लाड यांचे प्रत्युत्तर

"बाय द वे, मि. जरांगे, मराठा समाजाला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे, 'नरेटिव्ह'ची नाही!  काल आपण मला शिविगाळ करताना जो आकांडतांडव केला आणि जे प्रमाणपत्र फडणवीसांच्या एसपीने नाकारले असे सांगितले, त्याची मूळ हकिकत जाणून घ्या. हे प्रकरण ठाणे एसपींच्या हद्दीतील नाही, तर ठाणे पोलिस आयुक्तांच्या हद्दीतील आहे. सखाराम रामचंद्र ढाणे, जिंतूर, परभणी यांनी २०२३-२०२४ चे नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. (६ जून २०२४ च्या जाहिरातीनुसार) त्यांच्याकडे २०२४-२५ या वर्षाचे प्रमाणपत्र होते. त्यामुळे त्यांनी स्वत: एक प्रमाणपत्र भरून खुल्या प्रवर्गातून संधी देण्यात यावी, असे हमीपत्र दिले. आमची तीच अपेक्षा आहे, तुम्ही योग्य माहिती घेत जा आणि मग बोलत जा. मी पुन्हा सांगतो, मराठा समाजासाठी मी कितीही शिविगाळ ऐकायला तयार आहे. पण, मराठा समाजासाठी ६० वर्षांत कुणी काय केले आणि कुणी काय केले नाही, यावर एकदा खुली चर्चा होऊन जाऊ द्या!," असे प्रसाद लाड यांनी म्हटलं.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलPrasad Ladप्रसाद लाडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस