शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे आमदार राम कदम यांच्यामुळे परिचारकांचा पगार रोखला

By अतुल कुलकर्णी | Updated: September 6, 2018 01:23 IST

निलंबन रद्द केल्यामुळे त्यांचा आमदार म्हणून मिळणारा पगार त्यांना द्यावा, असा विषय बुधवारी झालेल्या बैठकीत आला होता.

मुंबई : भाजपाचे आ. राम कदम यांनी दहीहंडीच्यावेळी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यभर तीव्र संताप व्यक्त होत असताना भाजपाचेच दुसरे आ. प्रशांत परिचारक यांच्या निलंबन काळातला पगार देण्याचा व त्यांचा विधानभवनातील प्रवेश सुरूकरण्याचा निर्णय घेतला तर वातावरण आणखी खराब होईल असे सांगत विधिमंडळात झालेल्या बैठकीत कोणताही निर्णय न घेता हा विषय लांबणीवर टाकण्यात आला.सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी बैठक बोलावली होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे नेते अनिल परब, राष्टÑवादीचे नेते हेमंत टकले यांच्यासह विविध गटनेते उपस्थित होते. परिचारक यांनी पंढरपुरात भाजपाच्या प्रचार सभेत भाषण करताना सैनिक सीमेवर लढत असतात आणि त्यांच्या बायका इकडे बाळंत झाल्या की ते तिकडे पेढे वाटतात, असे संतापजनक विधान केले होते. त्यावरुन भाजपाला तीव्र असंतोषाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर परिचारक यांचे निलंबन केले. मात्र गेल्यावर्षी त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले तेव्हा शिवसेना, काँग्रेस आणि राष्टÑवादीने गदारोळ केला. त्यामुळे निलंबन रद्द पण त्यांना विधानभवन परिसरात येता येणार नाही, असा आदेश सभापतींनी दिला.निलंबन रद्द केल्यामुळे त्यांचा आमदार म्हणून मिळणारा पगार त्यांना द्यावा, असा विषय बुधवारी झालेल्या बैठकीत आला होता. मात्र दहिहंडीच्या दिवशी भाजपाचे आ. राम कदम यांनी मुलगी पसंत असेल तर पळवून आणून देईन, असे विधान केल्याने पुन्हा राज्यभर भाजपाच्या विरोधात वातावरण सुरूझाले. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आ. परिचारक यांना पगार दिला तर आणखी आगीत तेल टाकल्यासारखे होईल, असे सांगून बैठकीत जमलेल्या सदस्यांनी हा निर्णय आज घेऊच नये अशी भूमिका घेतली. मंत्री पाटील यांनी देखील भाजपासाठी हा अडचणीचा विषय होईल असे सांगत यावर निर्णय आत्ता नको असे स्पष्ट केले. तर शिवसेनेचे आ. परब यांनी जर हा निर्णय घेतला तर आम्ही राज्यभर आंदोलन करु, अशी भूमिका घेतली. आता पगारही नाही आणि विधानभवनात येता येणार नाही, अशी स्थिती आ. परिचारक यांची झाली आहे.

टॅग्स :Ram Kadamराम कदम