शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

'महाराष्ट्रात 1 हजार कोटींची दलाली होते, तेव्हा हे नेते गप्प बसतात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 18:23 IST

'महाविकास आघाडीच्या नेत्यांची प्रकरणांवरुन लक्ष दुसरीकडे हटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत'

मुंबई: गोवा क्रुझ पार्टी आणि राज्यातील ड्रग्स छापेमारी प्रकरणावरुन नवाब मलिक(Nawab Malik) आणि एनसीबी(NCB) अधिकारी समीर वानखेडे(Sameer Wankhede) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मलिक यांनी वानखेडे यांच्यावर खंडणी, लाचखोरी आणि बनावट कागदपत्राद्वारे नोकरी मिळवणे असे गंभीर आरोप केले आहेत. त्यावर आता माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी भाष्य केलं आहे.

1 हजार कोटींच्या दलालीवर हे नेते गप्पमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणतात, हे प्रकरण सध्या न्यायालयात असल्यामुळे मी फार काही बोलणार नाही. पण अधिकारी आणि साक्षीदारांना टार्गेट करणे योग्य नाही. अशा प्रकारच्या प्रकरणातून फक्त प्रसिद्धी मिळते. महाराष्ट्रात 1 हजार कोटींची दलाली होते त्यावर हे नेते गप्प बसतात. गृहमंत्री फरार आहेत त्यावर हे गप्प आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांची इतकी प्रकरणे सुरू आहेत, त्यावरून लक्ष दुसरीकडे हटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी टीका फडणवीसांनी केली. 

हे खरोखर महावसुली सरकार आहेफडणवीस पुढे म्हणतात, एनसीबी ड्रग्स प्रकरणात कारवाई करतं, याचा वापर राजकीय दबाब आणण्यासाठी का होईल? मग असं म्हणायचं का, सगळ्या ड्रग्जवाल्यांसाठी तुम्ही बॅटिंग करत आहात ? मुळात त्यांचं दुःख आहे की, सतत पडणाऱ्या छाप्यामुळे खरोखर महावसुली सरकार आहे असा एक संदेश लोकांमध्ये जात आहे आणि त्यावर लोकांचा विश्वास बसतोय, असा टोला फडणवीसांनी यावेळी लगावला.

...तर कुठलाच खटला टिकणार नाहीसरकारवर दबाव टाकून साक्षीदारांना वादाच्या भोवऱ्यात आणायचे, हे जे सुरू आहे ते बरोबर नाही. साक्षीदारांची विश्वासार्हता न्यायालयाबाहेर समाप्त करण्याची पद्धत सुरु झाली तर कुठलाच खटला टिकणार नाही. पण एक गोष्ट निश्चित की या प्रकरणात काही आरोप निश्चित झालेत. एनसीबीतील वरिष्ठांनी त्या आरोपांची चौकशी केली पाहिजे. पण त्याच वेळी तपास अधिकाऱ्यांना धमकावणे आणि त्याची जात, धर्म काढणे आणि त्यावरुन आरोप करणे अत्यंत दुर्दैवी आहे. वानखेडे यांनी आपल्या प्रमाणपत्राबाबत खुलासा केलाय, त्यामुळे विशिष्ट हेतूने आरोप करणं योग्य नाही, असंही फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSameer Wankhedeसमीर वानखेडेnawab malikनवाब मलिकNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो