शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

भाजपाने केली शिवसेनेवर कुरघोडी

By admin | Updated: December 23, 2016 05:32 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील भव्य स्मारकाचे भूमिपूजन २४ डिसेंबरला होत असताना राज्यभरातील नद्यांचे

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील भव्य स्मारकाचे भूमिपूजन २४ डिसेंबरला होत असताना राज्यभरातील नद्यांचे पाणी अन् किल्ल्यांची माती असलेले कलश उद्या शुक्रवारी मुंबईत फिरविण्यात येणार आहेत. राज्य सरकारच्या वतीने हा कार्यक्रम होत असला तरी त्याआडून शिवसेनेवर कुरघोडी करण्याची संधी भाजपा साधत असल्याची जोरदार चर्चा आहे. राज्यभरातील जल व मृद कलश शुक्रवारी सकाळी १० वाजता चेंबूर नाक्यावर एकत्र आणले जातील. तेथून सकाळी ११ला या कलशांसह रथ निघेल. त्यात सुमारे एक हजार दुचाकीस्वार हाती भगवे झेंडे घेऊन असतील. ही कलशयात्रा सायंकाळी ४च्या सुमारास गेट वे आॅफ इंडियाला पोहोचेल. तेथे भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून, त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे कलश सुपुर्द करण्यात येणार आहेत. हे कलश  जिल्ह्याजिल्ह्यातून आणण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर देण्यात आली असली तरी ते आणणाऱ्यांमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांचाच भरणा असणार आहे. उद्याच्या कलश यात्रेच्या आयोजनात शिवसेनेचे मंत्री वा नेत्यांचा सहभाग नाही. भाजपा, भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते उत्साहाने कलशयात्रेत उतरणार आहेत. २४ डिसेंबरच्या शिवस्मारक भूमिपूजनापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस हे कलश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द करतील. संपूर्ण कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची पत्रपरिषद झाली. स्मारक प्रकल्प समितीचे अध्यक्ष आ.विनायक मेटे उपस्थित होते. या तिघांसह गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, आ.राज पुरोहित यांनी आज भूमिपूजनस्थळी भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. २४ तारखेला दुपारी ३ वाजता भूमिपूजन समारंभ अरबी समुद्रातील बेटावर होईल आणि तेथून मोदी आणि अन्य पाहुणे मोटारीने बीकेसीतील सभास्थळी जातील. या मार्गावरही पोवाडे, साहसी खेळ आदी कार्यक्रमांनी त्यांचे स्वागत केले जाईल. शिवराज्यभिषेकाच्या वेळी अठरापगड जातींच्या कलावंतांनी त्यांच्या कलागुणांचे दर्शन घडविले होते. स्मारकाच्या भूमिपूजनानिमित्त २४ तारखेला गिरगाव चौपाटीवर असेच कार्यक्रम होणार आहेत.उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष!शिवस्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर बीकेसीमध्ये आयोजित समारंभात मोदी यांचे मुख्य भाषण होईल. राज्यपाल सी.विद्यासागर राव अध्यक्षस्थानी असतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य पाहुणे असतील. निमंत्रण पत्रिकेत सन्माननीय अतिथींमध्ये पहिले नाव हे शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आहे. मात्र, पत्रिकेत त्यांचे पद हे कार्याध्यक्ष, शिवसेना असे लिहिलेले आहे. ठाकरे यांच्याशिवाय, केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू, नितीन गडकरी, सुरेश प्रभू, रामदास आठवले, खा.उदयनराजे भोसले आणि खा.संभाजीराजे भोसले हेही विशेष सन्माननीय अतिथी असतील. (विशेष प्रतिनिधी)शिवस्मारकात मच्छीमारांना रोजगारशिवस्मारक उभारताना मच्छीमार बांधवांचे नुकसान होऊ दिले जाणार नाही, या स्मारकात निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधीमध्ये मच्छीमार बांधवांना प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिक्षण मंत्री तावडे यांनी दिली. स्मारकाच्या निमित्ताने मच्छीमार बांधवांच्या तक्रारी निकालात काढण्यासाठी शासन-मच्छीमार प्रतिनिधींची समिती स्थापन केली जाईल.