शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरमध्ये सर्वाधिक मते भाजपाच्या वाट्याला

By admin | Updated: February 25, 2017 03:05 IST

उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक मते घेणारा पक्ष हा भाजपा असून त्या पक्षाने शिवसेनेला मागे टाकले आहे. भाजपाने या निवडणुकीत ३३ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळविला आहे.

पंकज पाटील, उल्हासनगरउल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक मते घेणारा पक्ष हा भाजपा असून त्या पक्षाने शिवसेनेला मागे टाकले आहे. भाजपाने या निवडणुकीत ३३ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळविला आहे. भाजपा आणि त्यांच्या पुरस्कृत उमेदवारांना मिळून एकूण २ लाख ८८ हजार मते मिळाली तर शिवसेनेला १ लाख ९० हजार मते मिळाली आहेत. तसेच ठराविक प्रभागांसाठी मर्यादीत न राहता साई पक्षानेदेखील मोठी भरारी घेतली असून या पक्षाला तिसऱ्या क्रमांकांची १ लाख २ हजार मते मिळाली. या निवडणुकीत ३६ हजार १८३ मते ही केवळ ‘नोटा’ ला मिळाली आहेत. ‘नोटा’च्या मतांचा आकडा काही प्रभागात एवढा मोठा आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि एका प्रभागात तर शिवसेनेला ‘नोटा’पेक्षा कमी मते मिळाली आहेत. उल्हासनगरमध्ये शिवसेना आणि भाजपा अशीच थेट लढत होणार अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र, काही वॉर्डांत साई पक्षाने भाजपा व शिवसेनेला आव्हान निर्माण केल्याचे दिसत आहे. दलित मतांचा प्रभाव हा विशिष्ट भागापुरता मर्यादीत दिसत होता. उल्हासनगर कॅम्प चार आणि पाचमध्ये शिवसेनेचे वर्चस्व दिसत असले तरी भाजपा त्यांच्या खालोखाल आहे. मात्र, हा भाग वगळता शहरात बहुसंख्य ठिकाणी भाजपाचेच वर्चस्व दिसत आहे. मतदारांनी भाजपाला भरभरुन मते दिल्याचे या निवडणुकीत दिसत आहे. साई पक्षाने चार ते पाच प्रभागात टक्कर देत आपले ११ नगरसेवक निवडूून आणले आहेत.