शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

भाजप सरकार मराठा, मुस्लिमांना आरक्षण देणार नाही - नितेश राणे

By admin | Updated: June 28, 2016 21:41 IST

राज्यात सत्तेवर असलेले सरकार मराठा व मुस्लिमांना कदापिही आरक्षण देणार नसून आरक्षणाच्या नावावर या समाजाला झुलवत ठेवले असून आता मराठयानो आरक्षण मिळवण्यासाठी

करमाळा : राज्यात सत्तेवर असलेले सरकार मराठा व मुस्लिमांना कदापिही आरक्षण देणार नसून आरक्षणाच्या नावावर या समाजाला झुलवत ठेवले असून आता मराठयानो आरक्षण मिळवण्यासाठी पेटून उठा असे अवाहन स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ.नितेश राणे यांनी येथे आज बोलताना केले.येथील विकी मंगल कार्यालयात स्वाभिमानी संघटना,संभाजी ब्रिगेड,शिवप्रहार संघटना यांच्या वतीने मराठा-मुस्लिम आरक्षण एल्गार मेळावा आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्यात नितेश राणे बोलत होते.मेळाव्यास स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन सातपुते,शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर-पाटील,संभाजी ब्रिगेड चे पुणे विभागीय अध्यक्ष किरणराज घाडगे,स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे-पाटील,स्वाभिमानी चे जिल्हाध्यक्ष संजय गुटाळ,मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रा.नागेश माने,संभाजी बिग्रेड चे बाळासाहेब सुर्वे,नितीन आढाव-पाटील,नितीन खटके,सचिन काळे ,अतुल फंड,गणेश कुकडे,विनय ननवरे,सुनिल सावंत,प्रतापराव जगताप,अलसहारा सोशल क्लब चे समीरबावा शेख,फारूक बेग,अश्पाक जमादार आदि व्यासपीठावर उपस्थित होते.आ.नितेश राणे म्हणाले की राज्यभर आपण आरक्षण मेळावे घेउन जनजागरण करीत आहोत.आज चा हा अकरावा मेळावा आहे असे सांगून भाजपा-शिवसेनेने आरक्षणाच्या अश्वासनावर विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या.गेल्या दोन वर्षा पासून मराठा-मुस्लिम,धनगर समाजास आरक्षण आज देतो..उदया देतो. तारीख पे-तारीख असे अश्वासन देत झुलवत ठेवण्याचे धोरण या सरकाने अवलंबिले आहे.गुजरात मध्ये हार्दीक पटेल ने आरक्षणासाठी जी लढाई लढली त्या पेक्षा ही मोठी लढाई आपणास लढावी लागेल असा इषारा आ.नितेश राणे यांनी देउन मराठा व मुस्लिम समाजास आर्थिक व शैक्षणिक उन्नतीसाठी आरक्षणाची गरज असून आरक्षण मिळवण्यासाठी मराठा व मुस्लिम बांधवांनी संघटित व्हावे आता विचाराची लढाई विचाराने लढणार नाही आरक्षणासाठी आता गप्प न बसता रस्त्यावरची लढाई लढणार असून त्यासाठी सर्वांनी साथ दयावी असे अवाहन केले.तारीख..पे..तारीख..गेल्या सप्ताहात विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या मराठा आरक्षण समितीची बैठक मुंबईत पार पडली या बैठकीत विनोद तावडे यांनी आरक्षण सबंधी उच्चन्यायालयात २८ जून रोजी तारीख असून त्या तारखेला राज्यसरकार आपली बाजू मांडेल असे सांगितले होते पण आज चौकशी केली असता उच्चन्यायालयात आरक्षणाची तारीखच नव्हती असे आ.नितेश राणे यांनी सांगून हे सरकार मराठयाची दिशाभूल करीत असून तारीख..पे.. तारीख देत आहे.

मराठा-मुस्लिम आरक्षण एल्गार मेळाव्याचे संयोजक स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय गुटाळा याने प्रस्ताविक केले तर संभाजी ब्रिगेड चे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सुर्वे यांनी अभार मानले.मेळाव्यास मराठा-मुस्लिम बांधव उपस्थित होते.