मुंबई : महाराष्ट्रातील नवनिर्वाचित भारतीय जनता पार्टी सरकार बरखास्त करावे, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. उद्या (गुरूवारी) यावर सुनावणी होणार आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिव जयराम पवार यांनी याचिका दाखल केली आहे.
भाजपने सरकार स्थापनेला जाणीवपूर्वक उशीर केला, हे गैर असल्याचे याचिकाकत्र्याचे म्हणणो आहे. 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर झाले. त्यानंतर नवे सरकार लवकर स्थापन होणो आवश्यक होते. तसे न होता सरकारने शपथविधी उरकून घेतला. बहुमत ही वादात आहे.