शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
3
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
4
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
5
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
6
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
7
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
8
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
9
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
10
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
11
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
12
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
13
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
14
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
15
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
16
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
17
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
18
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
19
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
20
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक

जवखेडला जाण्यासाठी भाजपाकडे वेळ नाही!

By admin | Updated: November 2, 2014 01:40 IST

अहमदनगर जिलतील जवखेडा येथे भीषण दलित हत्याकांड घडले. एकाच कुटुंबातील तिघांची अमानवीय पद्धतीने हत्या करण्यात आली.

मुंबई : अहमदनगर जिलतील जवखेडा येथे भीषण दलित हत्याकांड घडले. एकाच कुटुंबातील तिघांची अमानवीय पद्धतीने हत्या करण्यात आली. ही घटना घडली तेव्हा राज्यात राष्ट्रपती राजवट होती, परंतु राज्यपालांनी या कुटुंबाला भेटून धीर देण्याची तसदी घेतली नाही. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनाही जवखेडाला भेट देण्यासाठी अद्याप वेळ मिळालेला नाही. या प्रकारामुळे राज्यात वेगळा संदेश जात आहे, असा आरोप करीत हत्याकांडाच्या आरोपींना तात्काळ अटक न केल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी गांधी भवनमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले. 
प्रतिकूल निसगार्मुळे राज्यातील शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे. शेतक:यांची नड लक्षात घेता व्यापा:यांनी कवडीमोल भावात कापूस खरेदी सुरू केली आहे. नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने हमीभाव जाहीर करून तातडीने कापूस खरेदी सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी केली.  ते म्हणाले, अपु:या  पावसामुळे यंदा अनेक जिलंमध्ये सोयाबीनचे पीक आलेच नाही, तर धान उत्पादक पट्टयात अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाले आहे. पावसाच्या लहरीपणामुळे या दोन्ही पिकांचे उत्पादन करणारे शेतकरी उद्धवस्त झाले आहेत. या शेतक:यांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशीही मागणी त्यांनी केली. शेतक:यांचे हित लक्षात घेऊन काँग्रेस सरकारने घेतलेल्या निर्णयांना नवीन राज्य सरकारने बदलू नये. अन्यथा काँग्रेस तीव्र आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. राज्यात सर्वत्र डेंग्युची साथ सुरू असून, यासंदर्भात राज्य सरकारने युद्धपातळीवर कार्यवाही करावी, असेही ते म्हणाले. ठाकरे यांनी नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या मंत्रिमंडळाला शुभेच्छा दिल्या. राज्य सरकारच्या विधायक कामांना काँग्रेस पक्ष सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले. राज्य सरकारच्या सेवाहमी विधेयकाबाबत ते म्हणाले की, डिसेंबर 2क्11 मध्ये काँग्रेसने केंद्रात हेच विधेयक आणले होते. निश्चित कालावधीत सेवेची 
हमी देण्यासंदर्भात विधेयक आणण्याची भूमिका काँग्रेसने नेहमीच मांडली आहे. नव्या विधेयकाला तपासून ते जनतेच्या आशा-अपेक्षांना पूर्ण करणारे असल्यास त्यासंदर्भात काँग्रेस पक्ष राज्य सरकारला सहकार्य करेल.   (प्रतिनिधी)