शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

‘एमआयएम’ला भाजपाची जाणीवपूर्वक शक्ती - पवार

By admin | Updated: February 9, 2015 06:11 IST

‘घरवापसी’वाली भाजपा जाणीवपूर्वक ‘एमआयएम’ला शक्ती देण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी शंका येते. यामुळे हिंदू व मुस्लीम धर्मांत तेढ निर्माण होत

पुणे : ‘घरवापसी’वाली भाजपा जाणीवपूर्वक ‘एमआयएम’ला शक्ती देण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी शंका येते. यामुळे हिंदू व मुस्लीम धर्मांत तेढ निर्माण होत असून, देशाच्या ऐक्याला सुरूंग लागणार आहे. हे ध्यानी घेऊन मुस्लीम समाजालाबरोबर घेऊन त्यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केले.राष्ट्रवादी प्रतिनिधी संमेलनाच्या समारोपप्रसंगी पवार बोलत होते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी, विधिमंडळ नेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, व अन्य नेते उपस्थित होते. ‘एमआयएम’ ही हैदराबादमधील एक संघटना आहे. मात्र, नांदेडमध्ये यश मिळाल्याने त्यांनी महाराष्ट्रात सभा घेण्यास सुरुवात केली आहे. मुस्लिम तरुण त्याकडे आकर्षित होत आहेत. हा काळ आव्हानात्मक आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मी संरक्षणमंत्री असताना बाबरी मशिदीचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न काही संघटनांनी केला होता, असे नमूद करतानाच, भाजपाकडून आताही घरवापसी, नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरण व शैक्षणिक अभ्यासक्रमांचे भगवीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी टीका त्यांनी केली. काँग्रेसची पोकळी भरून काढा !विरोधक म्हणून आव्हान पेलण्यासाठी काँग्रेस कमी पडत आहे. दिल्लीच्या निवडणुकीतही काँग्रेस कमजोर दिसत आहे. त्यामुळे ही पोकळी राष्ट्रवादीने भरून काढावी; याला महाराष्ट्रातून सुरवात केली पाहिजे, असे पवार म्हणाले. आपण सत्तेत नसून विरोधी पक्षाची भूमिका पार पाडून इतिहास घडविण्याचे पाईक होण्यासाठी संघर्ष केला पाहिजे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नव्या पिढीला संधी दिली पाहिजे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी लागावे, असे आवाहन पवार यांनी केले.मोदी यांचा थेट उल्लेख टाळला येत्या १४ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी व शरद पवार यांची बारमती येथे भेट होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांच्या भेटीची उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्याचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असे स्पष्टीकरण भाजपा आणि राष्ट्रवादीकडून देण्यात आले.या संमेलनातही राष्ट्रवादीतील अनेक माजी मंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कारभारावर थेट टीका केली. त्यामुळे समारोपाच्या भाषणात त्याविषयी पवार काय बोलणार, याची उत्सुकता होती. तब्बल एक तास दोन मिनिटांच्या भाषणात पवार यांनी भाजपा सरकारवर टीका केली. परंतु, मोदी यांच्याविषयी एकही शब्द उच्चारला नाही.