शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींविरोधात भाजपाची तक्रार

By admin | Updated: May 9, 2014 01:19 IST

अमेठी येथे मतदानादरम्यान राहुल गांधी यांनी ईव्हीएमजवळ जाऊन आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला.

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. अमेठी येथे मतदानादरम्यान राहुल गांधी यांनी ईव्हीएमजवळ जाऊन आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला. यासंदर्भात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीदेखील भाजपाकडून करण्यात आली आहे. बुधवारी मतदानादरम्यान अमेठी येथील तिलोई विधानसभा क्षेत्रातील तीन मतदार केंद्रांवर प्रवेश केल्यानंतर राहुल गांधी ‘ईव्हीएम’जवळ गेले होते. यावर आक्षेप घेत भाजपाचे वरिष्ठ नेता वेंकय्या नायडूनीयांनी पक्षाच्या शिष्टमंडळासोबत आयोगाच्या अधिकार्‍यांची भेट घेतली व याबद्दल तक्रार केली. नियमांनुसार केवळ मतदार, पीठासीन अधिकारी व मतदान अधिकारी हेच ‘ईव्हीएम’जवळ जाऊ शकतात.उमेदवाराला ‘ईव्हीएम’जवळ जाण्याची परवानगी नसल्याचा दावा भाजपाने केला आहे. अमेठीतून निवडणूक लढवत असलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी कधी नव्हे त बुधवारी झालेल्या मतदानादरम्यान आपल्या मतदारसंघात हजर होते़ पण याचदरम्यान आयोगाचे निर्देश पायदळी तुडवताना त्यांना पाहिले गेले़ मतदान सुरू असताना तीन मतदान केंद्रांवर ते ईव्हीएमजवळ (मतदान यंत्र) उभे असल्याची छायाचित्रे जारी झाल्यानंतर खळबळ उडाली़ यापैकी दोन मतदार केंद्रांवर ते मतदान यंत्राजवळ उभे असलेले दिसतात़ तिसर्‍या मतदान केंद्रावर मतदान यंत्रापासून दूर जाताना दिसतात़ दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने उमेदवाराने अशाप्रकारे मतदान यंत्राजवळ जाणे नियमबाह्य असल्याचे म्हटले आहे़ जर उमेदवार मतदान यंत्राजवळ जात असेल तर निवडणूक निर्णय अधिकारी त्याला जबाबदार असेल़ मतदार मतदानाचा हक्क बजावताना उमेदवार मतदान यंत्राजवळ जाऊन हस्तक्षेप करीत असेल तर ते लोकप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन असल्याचे हा अधिकारी म्हणाला़ ‘आप’चादेखील आक्षेप राहुल गांधी मतदान केंद्रात आतपर्यंत शिरून मतदारांशी बोलत असल्याची अनेक छायाचित्रे सोशल नेटवर्किंग साईटवर टाकून आम आदमी पार्टीनेही यासंदर्भात आक्षेप नोंदवला आह़े मतदान यंत्राजवळ राहुल उभे असतानाचे एक छायाचित्र अपलोड करून, ‘उमेदवाराला मतदान यंत्राजवळ जाण्याचा अधिकार आहे का?’ असा सवाल आम आदमी पार्टीने निवडणूक आयोगास केला होता़ नियमानुसार मतदान सुरू होण्यापूर्वी सकाळी ५ ते ७ या वेळात मतदान कसे करायचे किंवा मतदान यंत्रात बिघाड आहे का? यासाठीचे ‘मॉक ड्रिल’ केले जाते़ यावेळी उमेदवार किंवा संबंधित पक्षाचा एजंट मतदान यंत्राजवळ जाऊ शकतो़ राहुल गांधी सकाळी ७.३० वाजता अमेठीतील फुरसतगंज विमानतळावर उतरले होते़ त्यामुळे राहुल गांधी मतदानादरम्यान मतदान यंत्राजवळ काय करीत होते? याचे उत्तर निवडणूक अधिकार्‍यांना द्यावे लागणार आहे़